30 व 31 डिसेंबर ला दारूची दुकाने बंद ठेवा

37

🔸महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चाची मागणी

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

तसेच जे तरुण व्यसना पासून दूर आहेत ते देखील पार्टीच्या नावाखाली व्यसनाला बळी पडतात.व तिथून ते नियमित व्यसना ला सुरुवात करतात हा सर्व मुद्दा लक्षात घेऊन शासनाने महसूल च्या नावाखाली चालवलेला हा कारोभार लोकांच्या व महिलांच्या जीवावर उठणारा आहे.त्यामुळे 30,31 डिसेंबर रोजी शहरातील सर्व दारुदुकाने, बार, बंद ठेवण्यात यावे असे निवेदन धुळे जिल्हाधिकारी मा.श्री.संजय यादव साहेबांना देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र दारूबंदी महिला व युवा मोर्चा,वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामजिक संस्थांच्या अध्यक्ष गीतांजली ताई कोळी, डॉ. सुजाता आडे ,श्रीमती संगीता सैदाणे,श्रीमती वंदना बडगुजर,श्रीमती माधुरी शुक्ला,छात्रभारती चे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील,छात्रभारती चे संघटक निखिल ठाकरे उपस्थित होते