✒️सुनील भोसले(पुणे प्रतिनिधी)मो:-9146241956

पुणे(दि.29डिसेंबर):-आमदारअरुण गणपती लाड यांचा पदवीधर मतदान संघात मिळालेल्या यशाबद्दल कार्यकत्यांचे आभार पत्र वितरण व साधना महिला नागरी महिला पतसंस्था शिरूर यांच्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समिती माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ.सुजाता (भाभी) अशोक पवार प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी नितीन जाधव सर व त्यांचे सहकारी यांनी सर्व कार्यकर्त्यांना अरुण काका लाड यांच्या वतीने आभार पत्र व सत्कार जि.प सदस्या सौ.सुजाता (भाभी )अशोक पवार, पंचायत समिती सभापती.मोनिकाताई हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री.रवींद्र(बापु)काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री.मुजफ्फर कुरेशी,नगरसेवक श्री.जाकिरखान पठान या सर्वांच्या हस्ते आभार पत्र व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस मा.श्री.रविंद्र काळे यांनी प्रास्ताविक केले,त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे व सोशल मीडिया यांचे कौतुक केले. त्यानंतर साधना माहिला नागरी सह.पतसंस्थेच्या दिनदर्शिके चे प्रकाशन करण्यात आले. जि.प.सदस्य.सौ.सुजाता (भाभी) अशोक पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले ,त्या म्हणाल्या सर्व महिला आत्मनिर्भर झाल्य पाहिजे व ज्या अशिक्षित महिला आहे.

त्यांना स्व:ताची सही करता आली पाहिजे यासाठी मोहिम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी सौ.साधना संतोष शितोळे सौ.संगिता ताई शेवाळे, सौ.पल्लवी ताई शहा, सौ.तनिष्का ताई कर्डिले, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रंजनभैय्या झांबरे,राहील शेख, हाफिज बागवान, कलिम सय्यद, राजद्दीन सय्यद,निलेश पवार,प्रतिक काशीकर, संतोष शितोळे, इरफान पठान,श्री.प्रशांत पवार सोशल मीडिया उपस्थित होते.आमदार अरुण काका लाड यांच्या वतीने नितीन जाधव सर यांनी सर्वांचे आभार मानले.

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED