अपंगांना वैश्विक ओळखपत्रावरच तिकीट सवलत मिळणार

30

🔹अपंग जनता दल च्या आंदोलनाच्या इशाऱ्या मुळे सर्व आगार प्रमुखाला सक्तीचे पत्र

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.29डिसेंबर):-केंद्र सरकारने अपंगांची संपूर्ण देशात एकच ओळख मिळावी म्हणून वैश्विक ओळखपत्र ( UDID कार्ड ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते हे कार्ड देशातील कोणत्याही राज्यात अपंगांची ओळख म्हणून दाखविता येते . ज्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने दि . 18/01/2020 रोजी मा . महाव्यवस्थापक ( वाहतूक यांच्या परिपत्रानुसार राज्यातील सर्व आगार व्यवस्थापकाला सक्तिच्या सुचना देण्यात आल्या की वैश्विक ओळखपत्रावर अपंगांना तिकीट सवलत द्यावी व कोणत्याही प्रकारची तक्रार निर्माण करु नये असे आदेश देण्यात आले . पण लॉकडाऊन नंतर अनेक वाहकांनी अपंगांची दिशाभूल करणे सुरु केले.

व तिकीट सवलत वैश्विक ओळखपत्र कार्डवर देण्यास नकार देत होते . व अपंगांसोबत वाद विवाद करणे सुरु होते . अशा अनेक तक्रारी अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या त्याची दखल घेत अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्यासह शिष्ट मंडळाने 21/12/2020 रोजी विभाग नियंत्रक अमरावती मा . गभने साहेब यांची भेट घेऊन सविस्तर अपंगांच्या तक्रारीबद्दल चर्चा केली व आत्मदहन आंदोलनाचा इशारा सुध्दा दिला.

त्या अनुषंगाने 26/12/2020 रोजी जिल्हयातील सर्व वाहकांना विभाग नियंत्रक राज्य परिवहन अमरावती यांच्या पत्रानुसार वैश्विक ओळखपत्रावरच अपंगांना तिकीट सवलत द्यावी अशा सक्तीच्या सुचना देण्यात आल्या असून आता वैश्विक ओळखपत्रावरच अपंगांना तिकीट सवलत मिळणार आहे अशी माहिती मयुर मेश्राम , जिल्हाध्यक्ष अमरावती यांनी दिली .