रिक्त जागेवर आय. टी. आय.प्रवेशासाठी नव्याने प्रवेश अर्ज आमंत्रित

    53

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    गडचिरोली(दि.29डिसेंबर):- जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उमेदवारांना आॕनलाईन पध्दतीने दि. १ ते ४ जानेवारी पर्यंत प्रवेश अर्ज करता येईल किंवा जुन्या प्रवेश अर्जात दुरूस्ती करता येईल. दि.५ जानेवारी ला प्रवेश अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल तसेच याबाबतचे संदेश मोबाईलद्वारे उमेदवारांना प्राप्त होईल.

    दि. ६ ते ७ जानेवारी यादरम्यान दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना मुळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित औ. प्र. संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल. यासंबंधीत अधिक माहितीसाठी प्रवेश समितीचे श्री. मधुपवार आणि श्रीगिरीवार यांचेशी संपर्क साधावा , असे शास. औ.प्र.संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी कळविले आहे.