शाळा सुरू झाले पण बसेस सुरू नाही

35

🔹शिंदखेडा आगार प्रमुखांच्या घेराव

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.30डिसेंबर):- तालुक्यातील विद्यार्थ्यांना बसेस सुरू करा या मागणी साठी शिंदखेडा आगार प्रमुखांना घेराव घालण्यात आला व बसेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली.,यावेळी माजी नगरसेवक सुरज देसले विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यात विविध शाळा, महाविद्यालय सुरू झालेले आहेत.

म्हणूनच शिंदखेडा शहरात अनेक गावातील विद्यार्थी येत असतात.. परंतु अजून पर्यंत विद्यार्थी साठी बसेस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात अडचण येत आहे..बसेस सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणूनच लवकरात लवकर तालुक्यात विद्यार्थ्यांना बसेस सुरू करा ही वि विनंती आगार प्रमुखांना करण्यात आली.