✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.1जानेवारी):-सामाजिक कार्यकर्ते महेशराव दिगंबरराव शेळके पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन तथा पाटोदा ग्रामपंचायत चे भास्कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन दि 1जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून परिसरातीलशेतकरी,शेतमजूर,कामगार,युवक, विध्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते सर्व पदाधिकारी तसेच मित्र परिवार यांनी शिबिरात सहभागी होत.

राज्यातील चर्चेतील असणारे पाटोदा ग्रामपंचायत चे सरपंच माननीय श्री भास्करराव पेरे पाटील यांच्या उपस्थितीत सामाजिक विविध उपक्रम राबून महेशराव शेळके यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर घेण्यात येणार असून मुख्य मार्गदर्शक श्री भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन आयोजित केले असून परिसरातील सर्व पदाधिकारी, मित्र परिवार, सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी उपस्थीत रहावे असे आवाहन महेश शेळके मित्र परिवार वतीने तथा सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी सांगितले आहे.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED