राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे ग्रामसाहित्य पुरस्कार जाहिर

36

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.1जानेवारी):-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या रा.जं.बोढेकर स्मृती ग्रामसाहित्य पुरस्कारासाठी सौ. शशीकला गावतुरे (मुल ) , रामकृष्ण चनकापुरे (गोंडपिपरी ), डाॕ. विठ्ठल चौथाले (चामोर्शी ), सौ. मालती सेमले (गडचिरोली ) यांची निवड करण्यात आलेली आहे. नुकतीच निवड समितीची बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली.

याप्रसंगी समितीचे सरचिटणिस ॲड. राजेंद्र जेनेकर , कार्यकारीणी सदस्य इंजि. विलासराव उगे, प्रा. श्रावण बानासुरे , देवराव कोंडेकर , संजय वैद्य , श्रीकांत धोटे , प्राचार्य पत्रे , डाॕ. मुळे , विलास चौधरी आदी उपस्थित होते . पुरस्कारादाखल मानवस्त्र , मानपत्र आणि ग्रामगीता निवडप्राप्त व्यक्तींना प्रदान करण्यात येईल. गेल्या दहा वर्षापासून सदर पुरस्काराचे वितरण वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

ग्रामीण भागात राहून साहित्य सेवेसोबत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीची निवड करण्यात येते तसेच सदर पुरस्कार निवडीसाठी अर्ज आमंत्रित केले जात नसून समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेल्या नांवावर सर्वानुमते चर्चा करून निवड करण्यात येते. प्रस्तुत पुरस्काराचे वितरण गोंडपिपरी येथे छोटेखानी स्वरूपात येत्या ३ जानेवारी ला मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.