मांडळ ता.शिंदखेडा उपसरपंच पदी बेबाबाई अशोक शिंदे यांची बिनविरोध निवड

30

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.2जानेवारी):- मांडळ या ग्रामपंचायतची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २०१८ मध्ये घेण्यात आली होती. यात भाजपाचे आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृताव खाली निवडणूक लढविली होती. यात प्रथम लोकनियुक्त सरपंच डोंगर बागुल सह बहुमताने ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. सरपंच लोकनियुक्त असल्याने निवडून आलेले सर्व सदस्यांना १ वर्ष उपसरपंच पद द्यावे असे जेणेकरून प्रत्येक भाऊबंदकीला न्याय मिळेल असे आमचे नेते आमदार जयकुमार भाऊ यांनी ठरवून दिले होते.

ठरल्या प्रमाणे प्रथम वर्षी विजय मोरे यांना उपसरपंच पॅड मिळाले दुसऱ्या वर्षी कल्पना ज्ञानेश्वर पवार यांना उपसरपंच पद मिळाले त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होत.आता तिसऱ्या वर्षी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मांडळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाची निवडीचा कार्यक्रम होता. ग्रामपंचायत गट नेते रामकृष्ण जगन्नाथ मोरे व सरपंच डोंगर दादा बागुल यांनी आमदार जयकुमार जी रावल साहेब यांच्याशी चर्चा केली.

त्यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी मांडळ गावातील परिस्थिती जाणून घेतली व मांडळ गावात आज पर्यत शिंदे परिवार ला सरपंच किंवा उपसरपंच पदाचा बहुमान मिळाला नव्हता म्हणू या वेळेस मांडळ गावातील शिंदे(पाटील) परिवाराची एकनिष्ठ व प्रामाणिक पणा मुळे शिंदे परिवारातील वार्ड क्रमांक २ मधील ग्रामपंचायत सदस्या बेबाबाई अशोक शिंदे(पाटील) यांना उपसरपंच पद द्यावे असे सांगितले.

आमचे नेते आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचना नुसार ग्रामपंचायत गट नेता रामकृष्ण जगन्नाथ मोरे व सरपंच डोंगर दादा बागुल यांनी सरपंच यांच्या घरी ग्रामपंचायत सदस्य, गावातील जेष्ठ मंडळी, तरुण मंडळी, यांची बैठक घेऊन या वर्षी बेबाबाई अशोक शिंदे यांचे नाव घोषित केले. उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ,तरुण यांनी एक मत दर्शविल्याने सौ. बेबाबाई अशोक शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. त्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मांडळ ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

दिलेली वेळे नुसार उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने या निवडणुकीचे निर्णय अधिकारी डोंगर बागुल सरपंच व सचिव म्हणून निवडणुकीचे कामकाज पाहणारे ग्रामसेवक आर.के.पाटील यांनी एकच अर्ज आल्याने सौ.बेबाबाई अशोक शिंदे(पाटील) यांना बिनविरोध उपसरपंच घोषित केले. यावेळी ग्रामपंचायत गट नेता रामकृष्ण जगन्नाथ मोरे.यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा आभार नवीन उपसरपंच बेबाबाई अशोक शिंदे यांचा ग्रामपंचायत कार्यालयात व कार्यालया बाहेर सर्वांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांसह उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर फटाक्याच्या अतिष बाजी करून आमदार जयकुमार भाऊ रावल व भारतीय जनता पार्टी च्या नांवे जयघोष होत. परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले. नवीन उपसरपंच यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच पहिल्या दिवशी ग्रामपंचायत सुशोभित कामाच्या गेटच्या कामाचे, व आमदार जयकुमार भाऊ यांनी 2515 योजनेतून रस्ता काँग्रेटिकरण कामाचे भूमिपूजन केले.

यावेळी उपस्थित, ग्रामपंचायत गट नेता रामकृष्ण मोरे, सरपंच डोंगर दादा बागुल, ग्रामपंचायत सदस्य गोविदा देवरे, वसंत मोरे, विजय मोरे, कल्पना पवार, मिनाबाई भामरे, माजी जिल्हा सदस्य रामनाथ मालचे, बबन शिंदे, मच्छिद्र ईशी, राजधर बागुल, गंजीधर बागुल,शालीग्राम मोरे,अशोक शिंदे, रावसाहेब शिंदे,अरुण शिंदे, राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, मनोहर मोरे, प्रभाकर मोरे, अनिल मोरे, चेतन मोरे, अशोक सोनवणे, सीताराम पिंपळे, मुकुंदा कुवर,अशोक बागुल, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर बागुल,ह भ प भटा महाराज, पांडू जय ला पाटील, पुना पवार, चिना शिंदे, प्रकाश भिल, या सह गावातील जेष्ठ, तरुण उपस्थित होते.