सैनिकी सेवेतून सेवानिवृत्ती झाल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने आयु. रवींद्र साळवे यांचा सत्कार

38

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

माजलगाव(दि.2जानेवारी):- तालुक्यातील भाटवडगाव येथील रहिवासी असलेले आयु. रवींद्र द्यानोबा साळवे यांची सैनिकी सेवेतून सेवानिवृत्ती झाली त्यामुळे गावातील सरपंच श्रीकृष्ण बप्पा कुटे तसेच गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आयु. रवींद्र द्यानोबा साळवे यांनी निस्वार्थ, त्याग, समर्पण या भावनेतून यशस्वी १७ वर्षे सैनिकी देशसेवा केली आहे. नुकतेच सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा गावातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी भाटवडगावचे सरपंच श्रीकृष्ण बप्पा कुटे उपसरपंच जमिल भाई शेख, ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ आनभुले, केशवभाऊ जाधव, परमेश्वर कुटे,दीपक साळवे,रामभाऊ आनभुले गोकुळ साळवे, भागवत सिरसट , बि.के जाधव, सोमेश्वर कुटे, नागु शिंदे, दत्ता ढेपे, पांडुरंग कुटे, शेख हाकिम, शेख सादेक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.