स्टोरीमिरर आयोजित ऑथर ऑफ द इयर – 2020 या पुरस्कारासाठी मतदान प्रक्रिया सुरु

27

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.2जानेवारी):- स्टोरीमिरर या आॅनलाईन साहित्य मंचाने ऑथर ऑफ द इयर – 2020 या डिजिटल साहित्य आणि सर्जनशील लेखन क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करत मतदान प्रक्रिया सुरु केली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या लेखकांचा सन्मान केला जातो. ऑथर ऑफ द इयर पुरस्कार रीडर्स चाॅईस व एडिटर्स चाॅईस या दोन प्रकारात प्रदान केला जातो. रीडर्स चाॅईस पुरस्कारासाठी वाचकांना आवडलेल्या लेखकाच्या साहित्याला मतदान करावे लागते तर एडिटर्स चाॅईस पुरस्कारासाठी स्टोरीमिररच्या संपादक मंडळाकडून लेखकांची निवड केली जाते.

ऑथर ऑफ द इयर – 2020 – रिडर्स चॉईस या पुरस्कारासाठी सप्ताहातील सर्वोत्कृष्ट लेखक, विविध स्पर्धांतील विजेते आणि संपूर्ण वर्षभरात आपले अव्वल दर्जाचे लेखन कौशल्य दर्शवणार्‍या लेखकांतून नामनिर्देशित केले जातात. 2020 या वर्षात स्टोरीमिरर लेखन करणार्‍या एकंदरीत लेखकांपैकी 2 टक्क्यांपेक्षा कमी लेखक नामनिर्देशित झाले आहेत. आता विजेत्यांचा निर्णय त्यांना मिळणार्‍या मतांच्या संख्येच्या आधारावर घेतला जाईल.

ऑथर ऑफ द इयर – 2020 – एडिटर्स चाॅईस या पुरस्कारासाठी ज्या लेखकाने साहित्य क्षेत्रात सातत्याने अव्वल दर्जाचे लेखन केले, त्यांना नामनिर्देशित केले जाते. यातील विजेत्यांची निवड स्टोरीमिररचे संपादकीय मंडळ, बिभू दत्ता राऊत (सीईओ-स्टोरीमिरर), दिव्या मिरचंदानी (मुख्य संपादक-स्टोरीमिरर) यांचा समावेश असलेल्या ज्युरींद्वारे केली जाईल.

विजेत्यांना वेगवेगळ्या श्रेणीनुसार प्रमाणपत्र, ट्राॅफी, ई-बुक पुस्तक प्रकाशन, स्टोरीम्रर शाॅप व्हाऊचर, यांसह विविध पुरस्कार प्रदान केले जातील.

तरी रीडर्स चॅईस पुरस्कारासाठी नामनिर्देशित लेखकांना मतदान करण्यासाठी स्टोरीमिररच्या www.storymirror.com या वेबसाईटवर लाॅगईन करा.
,स्टोरीमिरर(storymirror.com) हे एक लेखन, लघुकथा,कविता,कोट्स, ऑडिओ,व ब्लॉग सादर करण्यासाठीचे भारतातील पहिल्या क्रमांकाचे पोर्टल आहे.आतापर्यंत १०भाषां मधील ७० हजारहून जास्त लेखकांनी आपल्या कथा, कविता,कोट्स,ऑडिओ व ब्लॉग या सर्जनशील पोर्टलवर सादर केले आहेत.

९० लाखाहून अधिक वाचक वर्ग स्टोरीमिरर पोर्टला प्राप्त आहे.सर्जनशील लेखक, कवींना जगात असे व्यासपीठ प्राप्त करून देणारे स्टोरीमिरर हे एकमेव पोर्टल आहे.
स्टोरीमिरर सर्व लेखकांना आवाहन करू इच्छिते आपण आपले लेखन स्टोरीमिरर पोर्टलवर प्रकाशित करावे सोबतचं स्टोरीमिरर अंतर्गत आयोजित विविध स्पर्धा मध्ये सहभाग घ्यावा.ही सर्व सेवा निःशुल्क आहे यांची लेखकांनी नोंद घ्यावी.
आपले लिखाण सादर करण्यासाठी स्टोरीमिरर storymirror.com या वेबसाईटला भेट दया.

तसेच स्टोरीमिररचा storymirror.com या नावाने ॲप पण प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करू शकता.आपण ही नक्कीच एक वेळ स्टोरी मिरर जॉईन करा.
जॉईन करण्याकरती सपंर्क
श्री.रोशन मस्के सर. (स्टोरी मिरर, मराठी हेड )
मो:9768065763
श्री.अंगद दराडे.(स्टोरीमिरर)
8668682620