बोरिस येथे युवा अनुभव तर्फे सावित्री उत्सव उत्साहात

31

✒️ संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.2जानेवारी):-बोरीस – येथे अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत जिजाऊ युवती ग्रुप तर्फे फुले दाम्पत्य यांनी पुणे येथे १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा स्थापन केली. या ऐतिहासिक घटनेला १७३ वर्ष पूर्ण झाले. तसेच ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे.त्यानिमित्त सावित्री उत्सव-२०२१ साजरा करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. युवतींना सावित्रीबाई फुले आत्मचरित्र चे पुस्तक वाटप करण्यात आले. उत्साही युवतींनी केक कापून ऐतिहासिक दिवस उत्सहात साजरा केला, या उपक्रमात १५ युवतीं नी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी जिल्हा समनव्यक अश्विनी जाधव, अनुभव साथी प्रतिभा पाटील,रिया हिरे,धनश्री पाटील, मनीषा हिरे, जयश्री पाटील या युवती परिश्रम घेत आहे.