भारतीय बौद्ध महासभा तालुका व जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने भीमा-कोरेगाव शौर्यदिन व मानवंदना

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.3जानेवारी):- दिनांक 1 जानेवारी 2021 ला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व जिल्हा शाखा यवतमाळ चे वतीने भीमा-कोरेगाव शौर्य दिनाचे निमित्ताने डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यात आली.

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला आद. ललित बोरकर, गौतम कुंभारे, सिध्दार्थ बन्सोड यांनी संस्थेचे वतीने पुष्पहार अर्पण केला.

भारतीय बौध्द महासभा जिल्हा अध्यक्ष आद. रविजी भगत यांचे हस्ते व सोबत सर्वांनी त्रिसरण पंचशील ,भिमस्मरण भिमस्तुती घेवुन शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यात आले. मानवंदना कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे सैनिक उपासक व उपासिका तथा संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते