महादेववाडी तलावात हॅन्डग्रेनेट बॉम्ब सापडला

55

🔺जनतेत भितीचे वातावरण

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.3जानेवारी):-तालुक्यातील महादेववाडी पाटीच्या जवळ असलेल्या तलावात हॅन्डग्रेनेट बॉम्ब असल्याचे महादेववाडी येथील तुकाराम ज्ञानोबा वलसे यांनी अहमदपूर पोलीसांना माहिती दिली. त्यामूळे महादेववाडीसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

सविस्तर माहिती अशी की,महादेववाडी हे अहमदपूर – लातूर हायवे वर या राष्ट्रीय महामार्गालगत आहे.महादेववाडी येथील तुकाराम ज्ञानोबा वलसे यांच्या माहितीवरून तात्काळ पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, बीट अंमलदार वैजेनाथ समुखराव, प्रशांत किर्ती, रमेश आलापुरे यांनी संबंधित स्थळास भेट देताच परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन लातुर येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक यांना पाचारण करून बॉम्ब वर नियंत्रण ठेवण्यात आले.

अहमदपूर पोलीस व प्रशासनाने सकाळी दहा वाजल्यापासून पोलिस प्रशासन व बॉम्ब शोधक व नाशक पथक तलावावर तैनात असुन तत्परतेने कारवाई करत असून सांयकाळच्या सात वाजेपर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे आदेश मिळाले नव्हते.बॉम्ब निकामी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची वाट पाहत असुन सापडलेला बॉम्ब जुना असुन तो एकच असावा अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी दिली.

आठ दिवसांपूर्वी पासून त्याच तलावा मध्ये मगर असल्याची अफवा जास्तच पसरलेली होती चर्चा असता आज त्याच तलावात हॅन्डग्रेनेट बाॅंम्ब असल्याने अहमदपूर, लातूर परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे…