भीम आर्मी यवतमाळ जिल्हा कमिटीने घेतली भाई चंद्रशेखर आजाद रावण यांची भेट

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.3जानेवारी):-१ जानेवारी१८१८ शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगांव येथील विजयस्तभांला भीम आर्मी यवतमाळ जिल्हा कमिटिकडून मानवंदना देण्यात आली.!

यावेळी यवतमाळ जिल्हा कमिटिने संघर्ष नायक संविधान रक्षक भीम आर्मी संस्थापक तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड .भाई चंद्रशेखर आजाद रावणजी यांची पुणे येथील लेमन ट्री हॉटेल येथे भेट घेतली.

यावेळी भीम आर्मी यवतमाळ जिल्हाप्रमख अशोकभाऊ भालेराव यांनी भाई चद्रशेखर आजाद रावण यांचा शाल आणि हार घालून सत्कार केला.! यावेळी सामाजिक विषयावर चर्चा झाली.!विशेष बाब म्हणजे भाई चद्रशेखर आझाद रावणजी यांनी यवतमाळ जिल्हा येथे होणाऱ्या सभेला येण्याची ग्वाही भीम आर्मी च्या यवतमाळ जिल्हा कमिटितील पदाधिकार्याना दिली.!

जेव्हा भाई चद्रशेखर आझाद रावण महाराष्ट्र दौर्यावर येतील तेव्हा यवतमाळ व पुसद येथे भाईची सभा होईल.!यावेळी भीम आर्मी विदर्भ उपाध्यक्ष बुद्धरत्नभाऊ भालेराव, यवतमाळ जिल्हाप्रमुख अशोकभाऊ भालेराव, जिल्हा मुख्य महासचिव धनराजभाऊ कांबळे, सनीभाऊ पाईकराव ,विपुल भवरे, अजिंक्य कांबळे, विधान भवरे इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.