सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त महिला शिक्षण दिन कार्यक्रम संपन्न

27

🔸माळी समाज चिमुर च्या वतीने आयोजन

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.3जानेवारी):-माळी समाज चिमुरच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त महिला शिक्षण दिन कार्यक्रम अभ्यंकर मैदान चिमुर यर्थे घेण्यात आला.आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तथा माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती विषद केली. आजच्या स्त्रीयांनी सावित्रीबाईंच्या कार्याचे महत्व जाणून सावित्रीबाईंच्या विचारांना अंगिकारावे, असे सांगण्यात आले.

सावित्रीबाईंच्या कार्याचा ध्यास घेवुन व त्यांनी केलेलया स्त्रीयांच्या हक्क तथा अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वृत्ती ओबीसी महिलांनी अंगी बाणावी, असे आवाहन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी वसंत वानखेड़े, माळी समाज अध्यक्ष भद्रीनाथ देसाई, सचिव अनूप लोथे, प्राध्यापक संजय साखरकर, माजी सरपंच बालु बोबाटे, नागरसेवक तुषार काले, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होत्या.
या कार्यमाचे यशवी आयोजन करन्याकरिता सुनील लोथे, गणेश लोथे, मनोज बनकर, विनोद लोथे, राकेश नंदुरकर, रूपेश मेश्राम, यशवंत लोथे, पवन वानखेड़े, संतोष वानखेड़े,अरविंद दानव, निशांत वानखेड़े, अर्चना लोथे, निशा वानखेड़े, कविता देसाई, दर्शना बनकर,अमिता लोथे, व सर्व माळी समाज बंधु भागिनिनी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे संचालन राकेश लोथे तर आभार प्रदर्शन लोमेश बनकर यानी केले