सरस्वती विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

31

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3जानेवारी):-शहरातील सरस्वती विद्यालयात दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा महाजन, छाया घोळवे, भुवनेश्वरी निळकंठ, मेघा तम्मेवार या महिला शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .या प्रसंगी पर्यवेक्षक रमेश गिराम ,एसएससी विभाग प्रमुख गोपाळ मंत्री, गोदावरी मुधोळकर, परमेश्वर कातकडे ,शिवप्रसाद मठपती, श्रीकांत दासरवाड आदींची उपस्थिती होती.