पुळूज ता.पंढरपूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ज्योती क्रांती परिषद

30

🔸पंचक्रोशीतील कर्तृत्वान महिलांना “सावित्रीगौरव” पुरस्कार

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.3जानेवारी):-पुळूज ता.पंढरपूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ज्योती क्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मंगलताई महाडिक, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मंगळवेढा नगराध्यक्षा अरूणाताई माळी, मोहोळच्या नगराध्यक्षा शाहीन शेखमॅडम, सीमाताई एकतपुरे, शैलाताई गोडसे, मुबीनाताई मुलाणी पुळूजच्या सरपंच स्वाती शेंडे, आरोग्यताई खरात मॅडम आदी माताभगिंनी उपस्थित होत्या.

पुळूज गावामधील आरोग्य विभाग, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय असणा-या सर्वच कर्तृत्वान महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खरंतर वर्षातील पहिला उत्सव आहे. या वर्षीपासून हा दिवस ”महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, ही आनंदाची बाब आहे.

यावेळी उपस्थित मोहोळचे नगराध्यक्ष रमेशजी बारसकर, नगरसेवक अतुल क्षीरसागर, माणिक बाबर, विठ्ठलनाना पाटील, नवनाथ खळगे तसेच आकाश नाळे, किशोर वाघ, गणेश पाटील, वसीम मुलाणी यांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केल.