दोंडाईचा येथे सावित्रीआई फुले जन्मोत्सव, महिला शिक्षण दिन

26

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.4जानेवारी):- दोंडाईचा येथील संतोषी माता मंदिराजळील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सौ.प्रमिलाताई सूर्यवंशी व बापू सूर्यवंशी यांनी सावित्रीआई फुले व तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमापूजन यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित सावित्रीबाई फुले बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष मनोज महाजन सर,महाराष्ट्र माळीसमाज दोंडाईचा शहराध्यक्ष रवींद्र माळी,युवा अध्यक्ष मयूर महाजन, उपाध्यक्ष आप्पाजी महाजन,कर्मचारी आघाडी अध्यक्ष अनिल जाधव सर, सचिव अनिल माळी सर,तालुका सह सचिव भाऊसाहेब महाजन,योगेश चौधरी,सोनू कोळी,निलेश जाधव, निर्मल महाजन,कैलास माळी समाज बांधव आदी उपस्थित होते.