हणेगाव ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक

32

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देलगुर(दि.5जानेवारी):-सध्या सार्वजनिक ग्रामपंचायतचे निवडणूक लागल्याने देगलूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे हणेगाव येथील आहे.याच ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दि.१/१/२०२१ रोजी हणेगाव येथे बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर धूमाळ,आणि देगलूर पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या अध्यक्षतेखाली हणेगाव पोलिस चौकीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत गावातील दोन्ही पॕनलच्या उमेदवारांना बोलून घेऊन पोलीस प्रशासनाचे नियम अटी व या वर्षी मतदान करणारे मतदारांना पण सूचना सांगण्यात आले.या नियम अटीला मान्य करून सर्व उमेदवारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले.या शांतता कमिटीत उपस्थित असलेले मरखेलचे पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर,पोलीस उप निरीक्षक अजित बिरादार,हणेगाव बिट जमादार कनकवले साहेब,पांढरे,जोगीपेठे व दोन्ही पॕनलचे उमेदवार गावातील मतदार बांधव उपस्थित होते.