ढवळकेवाडी येथे हंगामी वस्तीग्रहचे राठोड यांच्या हस्ते उद्घाटन

34

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.5जानेवारी):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळेवाडी मार्फत दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी ऊसतोड कामगाराची पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी, त्यांच्या शिक्षणामध्ये वार्षिक खंड पडू नये म्हणून हंगामी अनिवासी वस्तीग्रह चे उद्घाटन एकनाथ देविदास राठोड हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संजय पांडुरंग पवार, मुख्याध्यापक लटपटे सर, सुरेश राठोड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपध्यक्ष बालासाहेब राठोड, प्रभू राठोड, नागनाथ राठोड विमलबाई प्रभू राठोड हे उपस्थित होते.