🔸आमदार इंद्रनीलजी नाईक यांची मांडवावाश्यांवर कौतुकाची थाप

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.6जानेवारी):-तालुक्यातील मांडवा येथील ग्रामपंचायत निवडणूक गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने बिनविरोध करण्यात आली असून मांडवा येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ आहे .
आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मांडवा येथील महिलांची सदस्य संख्या ही ३ किंवा ४ असायची परंतु या २०२१ च्या निवडणुकीमध्ये मांडवा येथील ९ ग्रामपंचायत सदस्य संख्यापैकी संगीता देवीदास गजभार, कमल कैलास राठोड, कविता विठ्ठल आडे, जयश्री गजानन आबाळे, शालिनी हरीभाऊ धाड, अल्का रमेश ढोले, आरती बाळु पुलाते ७ सदस्य ह्या महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत .

तसेच विजय फुलसिंग राठोड, गोपाल अरुण मंदाडे हे २ पुरुष या संबंधित सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पुसद तालुक्यामधील मांडवा ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत असावी की जिथे ८० टक्के महिला आहेत. अशी पुसद तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय आहे.

मांडवा ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आणून ९ सदस्यांपैकी ७ महिलांना प्राधान्य दिल्याबद्दल पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनीलजी नाईक यांनी निवडून आलेल्या सदस्यांचे तसेच समस्त मांडवावांश्यावर कौतुकाची थाप दिली.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED