पाॅवर ऑफ मिडियाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

    33

    ✒️पंढरपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पंढरपूर(दि.6जानेवारी):- दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवून त्या माध्यमातून आधुनिक विज्ञानाची ओळख करून देण्याबरोबरच समाजप्रबोधन करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मुख्य कार्यक्रम जिल्हा उप माहिती कार्यालय पंढरपूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून झाला.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा उप माहिती अधिकारी गरगडे यांचा सन्मान जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव वठारे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रारंभी जिल्हा सचिव प्रशांत माळवदे यांनी या पत्रकार दिनाचे महत्व विशद करत संघटनेच्या राज्यातील सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली.

    यावेळी जिल्हा अध्यक्ष  उत्तम बागल यांनी कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यां उपस्थितीत पंढरपूर शाखेच्या रिक्त असलेल्या शहर अध्यक्षपदी निलेश आगावणे यांची निवड जाहीर केली.यावेळी पंढरपूर तालुका सचिव(राज्य दैनिक बाळकडू) विकास सरवळे (दैनिक पुढारी)संभाजी वाघोले, तानाजी जाधव, अशपाक तांबोळी,गलांडे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.