शिवधर्म दिनदर्शिकेचे पत्रकारांच्या हस्ते अनावरण

29

✒️सिन्नर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिन्नर(दि.7जानेवारी):- शासकीय विश्रामगृह सिन्नर येथे महामित्र दत्ता वायचळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमीर सय्यद यांनी केले. यावेळी महाराष्ट्रात सर्वात प्रथम सिन्नर येथे मराठा सेवा संघातर्फे तयार करण्यात आलेल्या शिवधर्म दिनदर्शिकेचे अनावरण पत्रकारांच्या शुभहस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या सचित्र जीवन विचारदर्शिकेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंदा साळमुठे मोठे यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा स्तरावर पत्रकारितेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संदीप ठोक यांचा महामित्र परिवाराच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहकारमहर्षी नारायणशेठ वाजे यांनी पत्रकार बंधु कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने अविरतपणे काम करीत असल्याचे गौरवोद्गार काढले. स्टाइसचे चेअरमन पंडितराव लोंढे यांनी कोरोना काळात पत्रकारांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता दिलेले योगदान विषद केले. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी श्री. अनिल जाधव यांनी पत्रकार हे कोविड योद्यांपैकीच एक असल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. एस.बी. देशमुख यांनी पत्रकारांचे मानधन वाढवण्याची गरज असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपल्या मनोगतातून तानुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला संपादक असल्याचे सांगून त्याकाळी त्यांनी दीनबंधू मासिकातून केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याची ओळख करून दिली त्यासोबतच पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ असून समाजातील वास्तव मांडत असताना ते निपक्षपाती मांडण्याचे आवाहन केले.याप्रसंगी संदीप भोर, राजेंद्र अंकार, संदीप ठोक, विजय बोऱ्हाडे,कांताराम माळी, बाळासाहेब दराडे,श्रावण वाघ, कैलास नवले, अक्षय गायकवाड, इत्यादी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या वतीने सत्काराला उत्तर देताना राजेंद्र अंकार यांनी शिवधर्म दिनदर्शिकेचे अनावरण आमच्या हातून होत असल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले तसेच पत्रकार श्री. संदीप भोर यांनी पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. याप्रसंगी अनिल जाधव, रवींद्र काकड, राजेंद्र जगझाप, संजय काकड, एस. एस. राठोड, आर. टी. गिरी, मंगेश मोरे, अनिल भाटजिरे, एम.ए. खैरनार उपस्थित होते.