नेर येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली

28

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(देि.7जानेवारी):-रोजी नेर येथे ग्रामपंचायतीची निवडणूक असून गावातील उमेदवारी ज्यांनी घेतलेली आहे. त्यांना व कार्यकर्त्यांना मीटिंगसाठी नेर पोलीस स्टेशन येथे बोलवण्यात आले होते. तसेच मा.हेमंत पाटील साहेब यांनी जे उमेदवार ग्रामपंचायत च्या रिंगणात उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांना प्रश्न विचारले. उमेदवारांनी उत्तरे देत ग्रामपंचायत ही निवडणूक कोणत्या ही विरोधकला व कार्यकर्त्याला विरोध न जाता ही निवडणूक तुमच्या परीने वाॅल्ड प्रमाणे निवडलेला उमेदवार ला मत द्या व शांततेत ही ग्रामपंचायत निवडणूक पार पाळा. असे सांगण्यात आले.

यावेळी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक सो. हेमंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक.७/१/३०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धुळे येथील तालुका पोलीस निरीक्षक हेमंत पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय गजानन गोटे,ए.एस.आय प्रल्हाद चव्हाण,पोलीस नाईक प्रमोद ईशी,पोलीस काॅन्स्टेबल राकेश मोरे,पोलीस मित्र छोटु कोळी, नेर गावातील पोलीस पाटील,पत्रकार व सर्व उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.