निळ्या क्रांतीसाठी

33

✒️लेखक:-संदीप गायकवाड
मो:-९६३७३५७४००

प्रदीपने आपल्या जीवनाला नवा आयाम देण्याचा चंग बांधला होता.नव्या शिक्षणातून नवा समाज घडावा अशी त्याची विचारशीलता होती.मनुष्य शिकल्यावरही स्वःताची विकृत नष्ट करत नाही.समाजातील अंधकार नष्ट करत नाही .आजच्या उच्चशिक्षित लोकांचा मेंदूत अंधभक्तीचे थैमान निर्माण करण्याचे कटकारस्थान सुरू आहेत.भारतात बाबा लोकांची मोठी भरती आली असून धर्माच्या नावाने जो वितंडवाद माजला आहे तो देशाला फारच धोकादायक आहे.आज धर्माच्या नावाने धंदा करणारे भोंदू बाबा जेलच्या अंदर आहेत.मीडिया नावाच्या नव्या काही चँनलने भारतीय संविधानाची सीमा उल्लंगण करून अठ्यान्नव टक्के लोकांच्या मेंदूवर कब्जा केला असून असत्यतेचा भडीमार करून लोकांना गुलाम केले आहे.

काही मीडिया अतिशय चांगले काम करत असून वास्तविकतेचा सत्यवृत्तपाठ मांडत आहेत .पण सरकार नावाचं शिंगरू त्यांना काबूत आणायचा प्रयत्न करत आहे.हाथरस मधील दलित मुलीवर झालेल्या अत्याचारची घटना न दाखवणारी मीडिया सकाळ संध्याकाळ कंगणा ,रिया व सुशांत यांची अखंड मालिका चालवते यावरून देशाचा तिसरा खांब कसा विकला गेला याची जाणीव भारतीय नागरिकांना होत आहे.देशातील घडणाऱ्या वाईट प्रसंगामुळे संवेदशील प्रदीप दुःखी आहे.त्याच्या मनात प्रचंड विद्रोह निर्माण झाला आहे.पण तो कोणताही असैंवधानिक मार्ग न स्वीकारता लोकांना शिक्षण देण्याचे काम करत आहे.काही युवकांच्या मदतीने ग्रामीण व शहरी भागात संविधानाचे महत्व समजावून सांगत आहे.बचत गटाच्या माध्यमातून तो महिलांना सरकारी यंत्रणेची माहिती देत आहे.प्रदीपने जीवनातील संघर्षातून नवा आत्मविश्वास संपादन केला आहे.

अनेक होतकरू लोकांना स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन करून आर्थिक क्रांती करत आहे.देशात घडणाऱ्या अनेक घटनेचा तो लेखातून व कवितेच्या माध्यमातून वाचा फोडत आहे.राजकारणातील छुपा अजेंडा लोकांना समजावून सांगू लागला . निळ्या क्रांतीसाठी तो समाजातील तरूणाच्या रक्तात नवी ऊर्जा पेरत आहे.रात्र झाली होती.लॉकडाऊनने सारे शहर शांत झाले होते.पण काही माणसे स्वतःच्या जीवनाविषयी चर्चा करत उभी होती.सरकारच्या चुकिच्या धोरणाने त्याचे कामधंदे बुडाले होते . सरकारने धान्य देण्याची घोषणा केली होती परंतु अजूनही ते धान्य त्यांना मिळाले नव्हते .कुठून तरी मदत मिळेल याचा ते विचार करत होते.अनेक सामाजिक संघटनाने उत्तम काम केले.तर काही संघटनानी चमकोगीरीचे काम केले .मदत छोटी करायची प्रपोगण्डा जास्त करायचा ही वृत्ती लॉकडाऊनच्या काळात पाहायला मिळाली .प्रदीपने आपल्या सहकार्यच्या साहाय्याने श्रमीक व निराधारासाठी काही मदत केली. कोरोना महामारीने सारे क्षेत्र उध्दवस्त केले होते.

देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईस आली आहे.भांडवलदाराच्या हितासाठी सरकारने अनेक सरकारी क्षेत्र विकायला काढली आहेत.शेतीचा व कामगार जीवनाचा कोणताही अनुभव नसलेले सरकार संविधानात्मक कृषीकायदे , कामगार कायदे ,आरक्षण कायदे,शैक्षणिक कायदे समाप्त करून भांडवलदारांच्या फायद्यासाठी नवे कायदे करत आहे.कृषी कायदे , कामगार कायदे ,आरक्षण कायदे ,नवे शैक्षणिक धोरण,यावर जन आंदोलन होत असतांना ते मागे घ्यायला तयार नाही.कोणतीही चर्चा न करता बहूमताच्या जोरावर असैंवधानिक कायदे पास केले जात आहे.या छुप्या धोरणाविरूध्द प्रदीप आवाज उठवत आहे.आंबेडकरवादी व लोकशाहीवादी तरूणांना योग्य दिशा दाखवत आहे.

ही लढाई आपल्या देशाच्या अस्मितेची आहे.ही लढाई जर आपण हरलो तर लोकशाहीचे पतन अटळ आहे.मनुव्यवस्थेच्या निर्मिती साठी काम करणाऱ्या संघटने विरूध्द आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून तो निळ्या क्रांतीसाठी सज्ज झाला आहे.प्रदीपने देशातील बेराेजगाराचा प्रश्न,स्त्री अत्याचार प्रश्न,शेतकरी – कामगार प्रश्न , असंघटित क्षेत्रातील प्रश्न, वंचित /आदिवासी , मागासवर्गीय यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन येणाऱ्या २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकित वर्तमान शासनाला जमीनदोस्त करण्यासाठी समाजात निळी विचार ऊर्जा संचारत आहे.प्रदीप या कामात यशस्वी होईल की नाही हे काळच सांगेल .पण प्रदीपने घेतलेला नवा वसा आंबेडकरी भारताला नवी दिशा नक्कीच देईल यात शंका नाही.