पाणीपुरवठा विभागाची बैठक

30

🔸दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक विविध विषयांवर चर्चा करुन पार पडली

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.7जानेवारी):- पाणीपुरवठा सभापती प्रवीण महाजन यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेऊन पाण्याचे लिकेजेस विषयी तक्रारी अधिकारी सोडवीण्यात अपयशी होत असुन नविन आंनदनगर जलकुंभावरुन पाण्याचा दाब जोरात असल्यामुळे जुन्या जलवाहिन्या कमी खोलीवर व निकृष्ठ दर्जाच्या असल्यामुळे त्वरीत मा.आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.नगराध्यक्ष ताईसाहेब नयनकुवँर रावल यांच्या अध्यक्षतेखाली नविन २१ कोटी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पुर्ण करुन नविन जलवाहीनीतुन नागरीकांना पाणीपुरवठा केल्यास गळतीचे प्रमाण बंद होऊन किमान दरदिवशी लाखो लिटर पाणी वाचेल हयगय करणारे ठेकेदार व अधिकारी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठणकावून सांगितले.

याप्रसंगी जितेंद्र गिरासे यांनी हुडको झोन चालु करुन जयहिंद काँलनीतील पाणीपुरवठा त्वरीत पुर्ववत करण्याविषयी सांगितले.भरतरी ठाकुर यांनी सालदारवाडीतील पाणीपुरवठा नविन जलवाहिनीवरुन सुरु करुन लिकेज काढण्यात यावे याविषयी सांगितले तसेच कृष्णा नगराळे यांनी सिद्धार्थ नगरमधील पाणीपुरवठा सुरु करावा तसेच उर्वरीत एम डी पी इ कन्नेक्शन द्यावीत संजय तावडे यांनी नविन भोईवाड्यातील जेसीबीला जागेअभावीअपुर्ण जलवाहिनी मनुष्यबळ वापरुन पुर्ण करावी असे सांगितले.

कर्मचांरीनी देखील आपल्या समस्या मांडल्या.पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी त्वरीत सर्व समस्यांवर उपाययोजना करु व संबंधीत ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल तसेच शहरातील गळतीचे प्रमाण कमी करुन नागरीकांना पाणीपुरवठा योग्य दाबाने करण्यात येईल असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवर पाणीपुरवठा सभापती प्रवीण महाजन, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, महिला व बालकल्याण सभापती भरतरी ठाकूर, माजी पाणीपुरवठा सभापती संजय तावडे, माजी आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, विभाग प्रमुख प्रकाश जावरे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था प्रमुख दिनेश विंचू, छोटू ओतारी, नंदू वाडीले, संदीप लोणारी, व सर्व वॉल मॅन उपस्थित होते.