दोंडाईच्यात नगरपरिषदेकडून झालेला रस्ता कॉंक्रिटीकरण निकृष्ट दर्जाच्या कामांना दोंडाईचातील शिवसैनिकांनी फोडली वाचा

30

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(देि.८जानेवारी):- शहरातील गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता नगरपरिषदेत आहे. या काळात विकास काम केल्याचा गवगवा नगरपरिषदेकडून सातत्याने केला जातो. मात्र नगर परिषदेकडून झालेला प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दोंडाईचा शहर शिवसेनेकडुन करण्यात आला आहे.
२०१६ साली दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेमध्ये सत्ता परिवर्तन होऊन भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांच्या ताब्यात एकहाती सत्ता आली. राज्यात भाजपाची एकहाती सत्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याचा गाजावाजा नगरपरिषदेत सत्तेत असलेल्या भाजपाकडून करण्यात येत होता. मात्र यात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन एकही दर्जेदार लोकोपयोगी काम झालेले नाही.

आज सकाळी ठिक ११ च्या सुमारास शिवसेनेचे शहरप्रमुख चेतन राजपूत, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार,उपशहर प्रमुख विजय भोई यांनी महादेवपुरा भागातील मुख्य चौकात,तसेच जे-जे हॉस्पिटलजवळ गेल्या सहा महिन्यापूर्वी ज्या रोडाचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले होते तेथुन भाजपाच्या ताब्यात असलेल्या या नगरपरिषदेत कुठे कुठे आणी किती प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याची पोलखोल मोहिम सुरु केली. या मुख्य चौकात सहा महिने होत नाही तोपर्यंत त्या कॉंक्रिट रस्त्याचे कॉंक्रिट उखडुन लोखंडी सळयांचे सांगाडे बाहेर आले आहेत. यावरुन लक्षात येते की, नगरपरिषदेमध्ये सत्ता असलेल्यांनी किती भ्रष्टाचार केला असेल.अश्या सर्वच विभागातील सर्व भ्रष्टाचारांची मालिकाच जनतेसमोर आणुण यांच खर रुप उघड पाडणार असल्याच यावेळी शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.

तसेच जे-जे हॉस्पिटल ते महादेवपुरा मुख्य चौक या रस्त्याच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून सबंधित अधिकारी,कर्मचारी,ठेकेदार तसेच सर्व यंत्रणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणी कठोर शासन व्हावे आणि संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी हजर नसल्याने कार्यालयीन अधिक्षक श्री.सावरे यांना निवेदन देण्यात आले आणी मुख्याधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करुन कार्यवाहीची मागणी केली.कार्यवाही न झाल्यास थेट मुख्यमंत्री महोदयांना याची तक्रार करणार असल्याचे दोंडाईचा शिवसेनेने स्पष्ट केले.