ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट

    36

    ?घोडाजरी शाखा नॅशनल क्रॉसिंग येथे कालव्याची पाहणी

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.8जानेवारी):-आज दिनांक 08/01/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आज मुंबई वरून घोडाजरी शाखा नॅशनल क्रॉसिंग येथे कालव्याची पाहणी करीत ब्रम्हपुरी येथे शासकीय तंत्रनिकेतन समोरील वनविभागाच्या खुल्या पटांगणावर हेलिकॉप्टर ने आगमन झाले.

    शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते,शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिर्हे,विधानसभा संपर्क प्रमुख संजयभाऊ काळे, माजी जिल्हा प्रमुख गडचिरोली सुरेंद्रभाऊ चंदेल,शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र नरड,युवा सेना चिटणीस मनीष जेठाणी,अविनाश गेडाम यांनी साहेबांचे हेलिपॅड वर जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहरातील व जिल्यातील शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी युवा सेना ,शिवसैनक मोठ्या संख्येने उपस्थित होते.