राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने समाजसेवकांचा सत्कार

31

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.9जानेवारी):- येथे करवीर तालुक्यातील वाडिपिर या गावांमध्ये भारत राखीव बटालियन कोल्हापूर 3 व राज्य राखीव पोलीस बटालियन बल गट क्रमांक16 कोल्हापूर यांच्या वतीने कोरोना संसर्गाच्या कालावधीत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक कोरोना युद्धाचा व समाजसेवकांचा सन्मान सैनिक दरबार हॉल येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक श्रीकांत पाठक (भा.पो.से) व सहाय्यक समादेशक शिवाजीराव जमदाडे यांच्या हस्ते राज्य राखीव पोलीस दलाचे जवान दिलीप कोकणे यांचे दिनांक २९ डिसेंबर रोजी सेवा बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले त्यामुळे कार्यक्रमात त्यांच्याप्रतिमेस श्रद्धांजली देण्यात आली व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सरपंच सेवा संघाचे समन्वयक (पुणे विभाग) सुरेश राठोड यांनी केले.

यावेळी समादेशक श्रीकांत पाठक यांच्या हस्ते समाज सुधारण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व संस्थाचालकांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती बाबासाहेब मेडशिंगे(सरचिटणीस भाजपा), बी.ए.पाटील (संस्थापक-राम पतसंस्था),राष्ट्रीय कॉग्रेसचे गटनेते शारगंधर देशमुख, जितेंद्र यशवंत (सरपंच), जनमत चे उपसंपादक सुरेश राठोड, नितीन कुमार तीवाटणे (इंजिनीयर), गोकुळ दूध संघ कोल्हापूर, 13 डिसेंबर ग्रुप, विश्वास टेड्रसचे संचालक दत्तात्रय पाटील, सुभाष भोसले (शिक्षक), सुमित्रा फराकटे (महिला उद्योजिका), स्मीता लंगडे महिला उदयोजिका, राजाराम चौगुले (पत्रकार), बिद्रीचे संचालक सुनिल कांबळे, अमृत महाडिक, प्रगती उदयोग च्या अध्यक्षा पूजा कदम, युवराज मिरजकर (शिवसेना शहराध्यक्ष), राजाराम चौगुले, कविता कचरे, मृणाल पाटील,अवधूत भाटे (आरोग्य दूत), अमर चौगुले (सहाय्यक लिपिक), शिवाजी वाडकर, संदिप गवळी , राहूल कोळी कोळी (पोलीस कॉन्स्टेबल), अतुल साळुंखे (आरोग्य दूत), सचिन चांदणी, यतिष वत्सराज, अरूण आरडे, पांडूरंग खोत,शाहू बॅक कोल्हापूरचे अध्यक्ष आदी मान्यवर होते.

कार्यक्रमाच्या शेवटी बी. ए. पाटील(सर) व पवन पाटील (शिक्षक) यांनी मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे पत्रकार व शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
पोलीस दलाच्या वतीने मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या मिळालेल्या विशेष सन्मानामुळे सर्वांचे अभिनंदन होत आहे .