श्री सेवागिरी समाधिमंदिर दिनांक 11 व 12 जानेवारी रोजी दर्शनासाठी बंद राहणार – श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव

29

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.9जानेवारी):- सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात रथोत्सव साजरा होत असतो, चालू वर्षी 12 जानेवारी 20 21 रोजी श्री सेवागिरी महाराज रथ उत्सव येत आहे ,मात्र कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आव्हान नुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक भाविक भक्तांना नम्र विनंती करण्यात येते की दिनांक 11 जानेवारी ते 12 जानेवारी 2021 अखेर श्री सेवागिरी महाराज संजीवनी समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. सदरचा निर्णय श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने सर्व विचारांती भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतला आहे.

परम पूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज मठाधिपती यांनी सर्वांना आवाहन केले आहे की श्री सेवागिरी महाराज सर्वांच्या हृदय कमळात विराजमान आहेत, म्हणून सर्वांनी रथोत्सवात दिवशी आपल्या घरी श्री महाराजांच्या प्रतिमेची पूजा आरती करुन मनोभावे स्मरण करावे .श्री मोहनराव जाधव श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार धार्मिक विधी व सुवर्ण मंडीत संजीवन समाधी ची महापूजेचे लाईव्ह दर्शन देवस्थान ट्रस्टचे अधिकृत फेस बुक पेज परमपूज्य श्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव .या पेजवर व युट्युब चॅनेल वरती दिसणार आहे.

श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणारी आपली धन रुपी सेवा रुजू करणे करता बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव खाते नंबर २०२०५६८०००७ IFSC code MAHBOOOO२३०या खात्यावर नंबर देणगी जमा करावी यावेळी विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव ,विश्वस्त श्री योगेश देशमुख, विश्वस्त श्री प्रताप जाधव, विश्वस्त श्री रणधीर जाधव, विश्वस्त श्री सुरेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.