कृष्णुर एमआयडीसी तिल कंपन्यांच्या दुर्गंधियुक्त पाण्याच्या विरोध्दात न्यायालयात याचिका दाखल करणार

68

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नायगाव(दि.9जानेवारी):- तालुक्यातिल कृष्णुर येथिल पंचतारांकित औध्योगिक वसाहतितील कंपन्यामधुन गेल्या आनेक दिवसापासुन सोडल्या जात असलेल्या केमिकल्स व दुर्गंधी युक्त गहाण सांडपाण्यामुळे बरबडा , अंतरगाव ,कृष्णुर ,या गावातिल बर्‍याच शेतकर्‍यांचे जनावरे दुषित पाणी पिउन बिमार पडले आसुन काही शेतकर्‍याची जनावरे दगावली आहे तर या पाण्यामुळे शेतकरी महिला व पुरुषांच्या पायाला जखमा.झाल्या आहेत कारण शेतकर्‍यांना , त्यांच्या महिलांना त्या पाण्यातुन दिवसा तिन चार वेळेस कामानिम्त येजा करावे लागत आहे त्यामुळे ते दुषित पाणी त्यांच्या पायाला जखमा करण्याचे काम करत आहे.

अगोदरच लंम्पि आजार ,ओला दुष्काळा, कोरोणा या नैर्सगिक संकटात सांपडलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम किर्ति गोल्ड, ,मेगाआनाज,मेडिसिन ,व ईतर बायो कोल , व्हेकेज,सिट्रस,मेडिशन ,orga treatment हि जपानचि कंपनि दुषित पाणी सोडुण नदिचे पाणी दुषित करत आहेत या ठिकाणी प्रत्यक्ष पाहाणी केल्यास यामध्ये जपानचि orga treatment हि कंपनि दुषित पाणी सोडण्यात अग्रेसर आसल्याचे दिसुन येत आहे.

या विषयी प्रदुषण नियंत्रण मंडळ व औध्योगिक विकास माहामंडळ याच्याकडे वारंवार शेतकरी लेखी तक्रारी देउन शेतकरी वैतागले आहेत कारण कंपणीचे मालक व प्रदुषन नियंत्रण मंडळ व औध्योगिक विकास महामंडळ यांच्यात साठेलोटे आसल्यामुळेच कसलिच ठोस कार्यवाही केलि जात नसल्यामुळे आता बरबडा येथिल शेतकरी देविदास जेटेवाड यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड , पोलिस अधिक्षक नांदेड ,कार्यकारी अभियंता माहाराष्ट्र औध्योगिक विकास महामंडळ नांदेड , माहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नांदेड यांना निवेदन सादर करण्यात आले ज्या शेतकर्‍यांचे जनावरे दगावली आहेत त्या शेतकर्‍यांना नुकासन भरपाई देण्यात यावि व दुषित पाणी सोडणार्‍या कंपन्यावर फोजदारी कार्यवाही, व दुषित पाणी सोडणे लवकार लवकर बंद करावे अशी मागणी केली आहे जात .तरी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावर काय ? कार्यवाही करतिल या कडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे