दिव्यांग व्यक्तीच्या सर्व योजनेची अंमलबजावणी करा – समीर पटेल

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.9जानेवारी):-दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या अनेक योजनेची शासन निर्णय पारित असुन सुद्धा त्यांची शासन स्तरांवर अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांग व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.जर दिव्यांगाच्या विविध योजना व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले.तर दिव्यांग व्यक्तीचा निश्चितच विकास होईल. असे मत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केले.

🔸एस टी बस सवलत
दिव्यांग व्यक्तीला 40 टक्केच्या वर अपंगत्व असल्यास दिव्यांगाला 75% प्रवास भाडे सवलत व तसेच दिव्यांग व्यक्तीला 65 टक्केच्या वर अपंगत्व असल्यास त्यांच्या सोबत व्यक्तीस 50% प्रवास भाडे सवलत शासन निर्णय व एस टी परिपत्रक असुन सुद्धा काही एस टी वाहकाकडुन दिव्यांगा कडून पुर्ण प्रवास भाडे घेण्यात येत आहे. *एस टी बस ही प्रवासीच्या सवलतीसाठी आहे. व्यवसाय करीता नाही.* पण काही विशेष एस टी बस मध्ये म्हणजे रातराणी, विठाई, लालपरी, शिवनेरी, शिवशाही, साधी बस मध्ये दिव्यांगा कडून पुर्ण प्रवास भाडे घेण्यात येत आहे. दिव्यांगाला प्रवास भाडे सवलत दिली जात नाही.व तसेच एस टी वाहका कडून दिव्यांग व्यक्तीशी सतत वाद विवाद आणि मनमानी कारभार सुरू आहे. व तसेच वाहकाकडुन दिव्यांगाला हिण वागणुक मिळत आहे.

🔹अंत्योदय राशन योजना
दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे.पण नांदेड जिल्हातील अंत्योदय राशन कार्डाचा ईष्टांक नसल्याने दिव्यांगाला अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नाही.व तसेच या योजने पासुन दिव्यांगाला वंचित राहावे लागत आहे. अंत्योदय योजनेचा ईष्टांक प्रत्येक तालुका स्तरावर त्वरीत मागणी करुन ईष्टांकात वाढ करावा. जेणेकरून उर्वरीत दिव्यांगाला या योजनेचा लाभ घेता येईल.

🔸दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पण आज पर्यंत एक हि दिव्यांगाला पायाभूत साधने व साहित्य मिळाले नाही. तरी या बाबतीत मा. जिल्हाधिकारी साहेबांशी भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे.तरी दिव्यांगाला तात्काळ साहित्य देण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

🔹दिव्यांग मित्र अॅप नांदेड
दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्याकरीता दिव्यांग मित्र अॅप नांदेड ची निर्मिती केली आहे.पण गेल्या 7 ते 8 महिन्यात या अॅप व्दारे एक हि दिव्यांगाला यांचा लाभ मिळला नाही. या अॅप मध्ये पात्र आणि अपात्र यांच्यातच जिल्हा व तालुका स्तरावर संबंधित कर्मचारी व्यस्त आहे.

🔸म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व दिव्यांगाला दरवर्षी किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण नांदेड जिल्ह्यातील एक ही दिव्यांग व्यक्तीला म.ग्रा.रो.ह.योजनेत लाभ मिळत नाही. व रोजगारा पासुन वंचित आहेत.

🔹दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी जागा
दिव्यांग व्यक्तीला आपल्या गावात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. जिल्हात एक ही शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती स्वयं रोजगारापासुन वंचित आहेत.

🔸5 टक्के दिव्यांग निधी
दिव्यांगासाठी राखिव असलेला 5% दिव्यांग निधी दिव्यांगावर पुर्णपणे व वेळेवर खर्च करण्यात येत नसल्याने दिव्यांग व्यक्तीला ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर पालिका, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदारा कडून 5% दिव्यांग निधी दिला जात नसल्याने दिव्यांग व्यक्तीला अनेक आर्थिक संकटांचा व अडी अडचणीशी सामाना करावा लागत आहे. व तसेच दिव्यांग निधी ईतर कोणत्याही कामासाठी खर्च करता येत नाही.तरी पण दिव्यांग निधी ईतर कामा करीता स्थानिक स्वराज्य संस्था खर्च आहे.

वरील सर्व योजनेसाठी दिव्यांग विकास संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष समीर पटेल हे दिवस रात्र पाठ पुरावा करत आहेत. व तसेच दिव्यांग योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांग व्यक्तीला आपल्या हक्कांच्या योजने पासुन वंचित राहावे लागत आहे. अशी खंत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केले आहे.जर वरील सर्व योजनेची अंमलबजावणी तात्काळ केली नाही.तर दिव्यांग विकास संघर्ष समिती कडून तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य चव्हाण, सुनील व्यव्हारे, फारुख कुरैशी, बंडु पाटे, अहेमद भाई, फहीमोद्दीन सरवरी, रमेश गोडबोले, शेख इम्रान, महेश चव्हाण, शब्बीर बेग, कुबिर राठोड, शंकर कदम,अ.गफुर, अंकुश कदम, सलमा शेख, दिपक सुर्यवंशी, सुलताना रतन कुरैशी, मारोती लांडगे, धुरपत सुर्यवंशी, सुरज राठोड, आकाश सोनुले, कांचन वानखेडे, प्रियंका राठोड,यावेळी उपस्थित होते.