मराठा सेवा संघाच्या वतीने प्रा. डाॅ. महेंद्र कदम यांचा सन्मान

    48

    ✒️नागेश खूपसे( सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.9जानेवारी):-मराठा सेवा संघाच्या वतीने टेंभुर्णी येथील कै.विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य, साहित्यिक डॉ.महेद्र कदम यांची महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिक्षण मंडळाच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा फेटा बांधून व पुस्तक देऊन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप,पत्रकार शिवश्री सतिश चांदगुडे,मराठा सेवा संघाचे शिवश्री नवनाथ दौड भाऊसाहेब, मराठा सेवा संघाचे शिवश्री निलेश देशमुख,शिवश्री गोरख खटके सर उपस्थित होते