रांगोळी येथील मुख्य रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

25

🔸मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.9जानेवारी):-रांगोळी गावातील मुख्य रस्ता अत्यंत खराब झालेला होता. सदरच्या रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन मिणचेकर साहेबांनी दिले होते. त्याअनुषंगाने मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या २५१५ योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी दिला. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आज मा. आमदार डॉ.सुजित मिणचेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मिणचेकर साहेबांचे गावच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. तसेच मुख्य रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर केलेबद्दल आमदार साहेबांचे आभार मानण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास रांगोळी गावचे सरपंच नारायण भोसले उपसरपंच तानाजी सादळे रमेश पाटील संजय शिंदे सुभाष नरंदे किरण हावलदार बापू मुल्लानी अण्णासो गोंडे सुनील पाटील सौ हेमा भोसले ताई संजय काटकर दीपक मोरे पांडुरंग सोदलगे अमोल देशपांडे संभाजी हांडे किशोर निकम बजरंग पाटील संजय लोहार संदीप सुतार जयवंत सादळे प्रफुल मगदूम बापुसो पाटील बाबुराव सादळे रणजित देवणे अमित सादळे शिवाजी सादळे राजू काटकर व इतर उपस्थीत मान्यवर उपस्थित होते.