ग्रामपंचायत भाजपा ला काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे -डाॅ. संजय कुटे

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

अकोला(दि.10जानेवारी):- जिल्हा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष आ डॉ संजयजी कुटे यांनी आज दिनांक 9 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय गांधी चौक अकोला येथे जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक आणि प्रभू श्रीरामचंद्र मंदिर निर्माण साठी निधी संकलन या दोन महत्त्वाचे विषयाला घेऊन आज आढावा बैठक घेन्यात आली. या बैठकीला तेजराव थोरात, विजय अग्रवाल यांचे सह जिल्हा पदाधिकारी, आघाडी अध्यक्ष, मंडल पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बाबत सविस्तर मार्गदर्शन करीत जास्तीत जास्त सदस्य आणि ग्रामपंचायत भाजपा ला काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचे आवाहन मा संजय जी कुटे यांनी केले व या कार्यासाठी खंबीर साथ देऊन यथा योग्य सर्व मदत देण्याचे आश्वासन यावेळी दिले