कापडणे येथे आईच्या पुण्यस्मरणार्थ श्री शेषणाथ संस्थान महामहेश्वर मंदिर परीसरात असलेल्या शिवज्योती अभ्यासीका व ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट

30

✒️ संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.11जानेवारी):-कापडणे येथील कै. मातोश्री श्रीमती रेशमाबाई निंबा माळी* यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ भेट कापडणे येथील रहीवासी श्री हीराजी श्रावण बोरसे हायस्कुलचे माजी शिक्षक व धुळे येथील महाजण हायस्कुल व ज्युनिअर काॅलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री शिवदास निंबा माळी यांनी आज रोजी त्यांच्या मातोश्रींच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ निमीत्ताने त्यांनी 3000/ रुपयांची बहुमुल्य कीमतीची पुस्तकं शिवज्योती ग्रंथालयास सुपुर्द केली.

ग्रामीण भागातील गरजु,हुशार,होतकरु तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत गावासाठी व समाजासाठी रुणानुभावाच्या भावनेतुन कुठल्याही प्रकारचा धार्मीक कार्यक्रम न करता एक दातृत्व म्हणुन श्री सदाशिव निंबा माळी यांनी दरवर्षीचा हा अभिनव उपक्रम आजपासुन दरवर्षी राबवण्याचे देखील निश्चय केलेला आहे.

यावेळी सदर कार्यक्रमास शिवज्योती अभ्यासीकेस पुस्तक भेट प्रसंगी शेषनाथ संस्थानचे अध्यक्ष शिवश्री महेश पाटील,मंदिराचे महंत योगी सिद्धनाथजी महाराज,शिवदास निंबा माळी व त्यांच्या पत्नी पुष्पलता शिवदास माळी, जेष्ठ साहीत्यीक रामदास आबा वाघ,देविदास आप्पा माळी,सौ निलिमा देविदास माळी आणी पत्रकार विठोबा माळी व विश्वप्रताप पाटील सह अन्य तरुण विद्यार्थीमित्र उपस्थीत होते.