कोरोनाकाळात रोटरी सिनियर्सची उल्लेखनीय कामगिरी आ.जयकुमार रावल

    41

    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

    दोंडाईचा(दि.11जानेवारी):-दि.१०/१/२१दोंडाईचा शहरातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात उपजिल्हा रुग्णालयात स्वँब चेम्बर , ३० रुग्णांसाठी सेंट्रल आँक्सिजन सीस्टीम व दैनंदीन लागणारे सिलिंडर इ.बसवीण्यात आली याप्रसंगी मदतीस फक्त सोशल मिडियातुन हाकेला धावून आलेल्या दात्यांचा सन्मान रोटरी भवन येथे पार पडला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल , आमदार जयकुमार रावल ,प्रमुख पाहुणे पदी रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर रो.प्रशांत जानी ,अँसिस्टंन्ट गव्हर्नर अनिश शाह ,रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमास बांधकाम सभापती निखिल जाधव , पाणीपुरवठा सभापती सौ वैशाली प्रविण महाजन , आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे ,नगरसेवक किशन दोधेजा ,गिरीधारी रुपचंदानी ,माजी नगरसेवक महेंद्र पाटील ,रोटरी क्लबचे अध्यक्ष रितेश कवाडं ,रतन कोठारी ,इनरव्हीलच्या अध्यक्षा मयुरा पारख ,ब्राम्हण महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री उपासनी, पत्रकार जितेंद्र गिरासे,सदाशीव भलकार ,समाधान ठाकरे , इ मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ.जयकुमार रावल यांनी सांगितले की आजकालच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जराही आजार झाला तर आपण गावातुंन शहरात शहरातुन नाशिक मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी किंवा विदेशात जाऊन उपचार करु शकतो परंतु जगभर कोरोनाचे संकट घोंघावत असतांना जग पुर्णपणे थांबलेले होते प्रत्येक व्यक्तीला आपला उपचार आहे त्याच ठिकाणी करणे क्रमप्राप्त होते कारण मोठमोठ्या शहरात हाँस्पीटलमध्ये बेड उपलब्ध नव्हते ,जाण्यायेण्याचे साधने नव्हती अशावेळी रोटरी सिनियर्सने आपल्याच शहरांमध्ये प्रथम स्वतच्या खर्चाने व‌ नतंर जनसहयोगातुन ३० रुग्णांसाठी सेंट्रल आँक्सिजन सीस्टीम बसवुन दररोज लागणारी सिलिंडर पुरवली म्हणुनच दोंडाईचा शहर व परिसरातील हजारो रुग्णांचे प्राण वाचले म्हणुन रोटरी सिनियर्स अभिनंदनास पात्र आहे असे गौरवोद्गार आ.जयकुमार रावल यांनी सेंट्रल आँक्सिजन सीस्टीमसाठी मदत देणारे दात्यांचा सन्मान करतांना काढले.

    सरकारसाहेब रावल यांनी अध्यक्षस्थांनावरुन बोलतांना सांगितले की देणा-याने देत जावे ह्या म्हणीप्रमाणे देणा-याला कधीही कमी पडत नाही मी दररोज गरजुंना मदत करीत असतो पण मला त्याच्या दुप्पट सायंकाळपर्यंत मिळते, रोटरी सिनियर्सने ” *सन्मान दातृत्वाचा* ” कार्यक्रम ठेऊन दात्यांचा सन्मान केला तसेच वर्षभरात नवनविन कार्यक्रम राबवुन खरे गरजुंना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणुन रोटरी सिनियर्स शहराचे नाव रोटरीच्या नकाशावर अधोरेखित करीत आहे .
    रोटरीचे डि.जी.रो.प्रशांत जानी यांनी सांगितले की संपूर्ण डिस्ट्रीकमध्ये रोटरी सिनियर्स प्रथमस्थानी असुन संपूर्ण भारतभरातील रोटरी क्लब मधुन ११ स्थानी आहे म्हणुन मला परत -परत दोंडाईचा येथे यावयासे वाटते.

    कार्यक्रमाचे प्रास्तावीकात रो. राजेश मुणोत यांनी सांगितले की रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून वर्षभर ज्यांचे पाय अपघाताने किंवा इतर व्याधी होऊन तुटलेला आहे त्यांना संपूर्ण पणे मोफत वर्षभर दर शनिवारी जयपुर फुट बसवीण्यात येतात ,जनसेवा रोटी बँकेच्या माध्यमातून दररोज किमान ५० गरजुंना पोळीभाजी व अत्यवस्थ तथा दुर्धर व्याधींनी आजारी २० रुग्णांना घरपोच टिफीन पाठवण्यात येतो तसेच रोटरी पतपेढीच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवयसायीक गरजुंना अत्यल्प दरात कर्जपुरवठा करण्यात येतो . कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी कँलेन्डर व रोटरी पतपेढीच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

    रो.रोटरी कँलेडरचे प्रो चेअरमन राजेश भंडारी यांनी सांगितले की कोरोना काळात कँलेन्डर आमचे सदस्य व नेहमीचे प्रायोजकांनी मदतीचा हात पुढे केला म्हणुन कँलेन्डर प्रकाशीत होऊ शकले तसेच यावर्षी मराठी सोबत इंग्रजी आवृत्ती देखील प्रकाशीत केल्याने महाराष्ट्राबाहेर देखील कँलेन्डर पोहचेल असे सांगितले.रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष रो.चेतन सिसोदिया यांनी डि.जी.प्रशांत जानी यांना ७७०००रु चा धनादेश डिस्ट्रीक फंडसाठी सोपविला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.प्रविण महाजन व रो.राजेश माखीजा यांनी केले , प्रविण महाजन यांनी सांगितले की दोंडाईचा सोशल व्हाँटसॲप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आणी पैशाचा ओघ सुरु झाला म्हणुन रोटरी सिनियर्सने सन्मान दातृत्वाचा कार्यक्रम ठेऊन दात्यांचा सन्मान केला तसेच मदतीचा लेखाजोखा देखील त्यांनी मांडला.आभारप्रदर्शन रो. डॉ राजेंद्र गुजराथी यांनी केले.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रो.चेअरमन रो.महेंद्र चोपडा ,रो.डॉ मुकुंद सोहनी, रो.डॉ अनिल सोहनी ,रो.सुरेश जैन ,रो.हुसेन विरदेलवाला ,रो.नामदेव थोरात , डॉ दिपक श्राँफ, रो.डॉ राजेंद्र पाटील, रो.राजेंद्र परदेसी ,सौरभ अग्रवाल ,रो.सौरव मुणोत ,रो.अमन जयस्वाल ,रो.मुर्तुझा ईझी ,रो.किशोर मालपुरकर ,रो.आशाताई टोणगांवकर ,रो.प्रतिभा ठोंबरे , के.टी.ठाकुर ,रो.रमेश पारख ,रो.जवाहर केसवानी ,रो.रविद्रं पाटील , रो डॉ.अनिल धनगर ,रो सुमित जैन , रो.डॉ गणेश खैरनार ,रो.केदारनाथ कवडीवाले , रो.डॉ हेमराज पाटील , रो.डॉ पुरुषोत्तम भावसार ,रो नविन पटेल इ सदस्यांनी परिश्रम घेतले.