माण पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.भरत चौगुले “कोविडं योद्धा” पुरस्काराने सन्मानित

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.13जानेवारी):-दिनांक -१२/०१/२०२१रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन पंचायत समिती माण (दहिवडी) ता.माण येथील सहाय्यक गटविकास अधिकारी-भरत बबन चौगले यांचा “कोविड-१९योद्धा” पुरस्काराने गौरव करणेत आला.

कोविड-१९महामारीच्या काळात एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपले कुटुंबियांसोबत सण उत्सव साजरे न करता स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता जनसामान्यांसाठी सामाजिक कार्याची बांधिलकी म्हणून अहोरात्र मानसिक ताणतणाव न ठेवता माण पंचायत समितीच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व माण पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सदर कालावधीमध्ये आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन सतत ग्रामीण भागामध्ये आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, गावस्तरिय समित्यांना मार्गदर्शन करणे तसेच विविध यंत्रनाणंशी सतत संपर्कात राहून कोविड-१९कालावधीत उत्कृष्ट काम केलेबद्दल व त्यांचे मनोबल वाढविणे साठी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष-डॉ.संघपाल उमरे यांचे आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष-हाजी अस्लम सय्यद,महिला समिती अध्यक्षा-माधुरी गुजराती व सातारा जिल्हा अध्यक्ष-सुभाष गायकवाड यांचे मार्गदर्शनाने जिल्हा उपाध्यक्ष-युवराज भोसले व माण तालुका अध्यक्ष-संतोष घाडगे व माण तालुका समन्वयक-राजेंद्र आवटे यांचे हस्ते कोविड-१९योद्धा पुरस्कार प्रदान करणेत आला या वेळी सामाजिक कार्यकर्ते-किरण खरात,कबीर बनसोडे,विजय भारती,निखिल कुंभार,विजय अवघडे,ग्रामसेवक-सतीश भोसले,दिपक आढाव व अभिजित ढेंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.