नेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.13जानेवारी):- नेर येथील राजे ग्रुप कडून स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरच जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करू. असे आवाहन नेर येथील राजे ग्रुपने सांगितले आहे. दरवर्षी जिजा माता जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. नेर येथील गांधी चौकात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या
हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन ह्या थोर मातेस विनम्र अभिवंदन करण्यात आले.

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या त्या राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता होत्या.१२ जानेवारी ला राष्ट्रमाता यांचा जन्मोत्सव येत असतो. म्हणून दरवर्षी प्रमाणे राजे ग्रुप कडून नेर येथील गांधी चौकात स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या फोटोवर पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले. यावेळी विक्की मोरे,हर्षल देशमुख, योगेश माळी, गौरव देशमुख, पिंकल बिरारी, हितेश पाटील,भूषण भदाने, निलेश पाटील, राकेश पाटील, जयश ईशी, हिमांशु जयस्वाल. प्रितम माळी आदी मान्यवर उपस्थित होते.