नेर येथे ग्रामपंचायत निवडणुकिसाठी उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन

    42

    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

    नेर(दि.13जानेवारी):- येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या जल्लोषात नेर गावात रॅली काढण्यात आली. उमेदवारांन सह कार्यकर्त्यांनी मोठ्य संख्येने सहभागी घेतला. नेर गावात ग्रामपंचायत निवडणुक लडण्यासाठी दोन पॅनल आमने सामने लडत आहेत.तर अपक्ष उमेदवारांची या वर्षी जास्त संख्येने उमेदवारी साठी अर्ज दाखल केला आहे. नेर येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणारी निवडणूक यावर्षी अत्यंत चुरशीची होत आहे.

    यात ६ वॉर्डातून १७ उमेदवार निवडणूक घ्यायचे असून त्यात एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. तर १६ जागांसाठी निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. त्यातही यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने प्रत्येक वॉर्डातील पॅनलच्या माध्यमातुन उमेदवारांची प्रचार रॅली काढण्यात आली.नेर येथील परिवर्तन पॅनल व जनता जनार्दन पॅनल आमने सामने ग्रामपंचायत निवडणुक लडत आहेत. दोन्ही पॅनल कडून व अपक्ष उमेदवारांन कडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.