प्रशिक्षणा सोबतच रोजगार व स्वंपयरोजगाची उत्तम संधी म्हणजेच प्रधानमंत्री कौशल्यं विकास योजना – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.13जानेवारी):- जिल्हयामधील गरजू दिव्यांग , अनाथ , शेतकरी आत्मनहत्याग्रस्ती शेतकरी कुटूबांतील पाल्यांना तसेच विधवा , परितक्या स्त्रियांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्ये प्रामुख्याने प्राधान्य देवून गरजू व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्तीसत जास्त् लाभ घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा कौशल्य विकास कार्यकारी समिती अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिले.

जिल्हलयामध्ये लवकरच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची सुरुवात करण्यांत येणार आहे. आतापर्यत केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या या योजनेची अंमलबजावणी आता राज्य सरकारव्दारे जिल्हा स्तरावरुन होणार आहे सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे अध्यंक्षतेखाली जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समीतीची सभा जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वा्ल , जिल्हा नियोजन अधिकारी गिरिश शास्त्री , शासकीय औघोगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) चे प्राचार्य राम मुळे , महानगरपालीकेचे शहरी प्रकल्प अधिकारी गणेश बिल्लेवार , डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ प्रशासन अधिकारी डॉ. किशोर बिडवे , डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ श्रीमती अर्चना बारब्दे , तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुधाकर झळके, उपस्थित होते.

या योजने बाबत अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, प्रशासकीय इमारत २ रा माळा अकोला या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा या कार्यालयाच्या ०७२४ – २४३३८४९ या दुरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED