म्हसवड फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्षपदी अमित मुल्ला यांची तिसऱ्यादा निवड
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.14जानेवारी):-फोटोग्राफर असोसिएशन याची दि.12 जानेवारी 2021 रोजी वार्षिक बैठक पार पडली याबैठकीत अमित मुल्ला यांनी बिनविरोध निवड झाली.अमित मुल्ला यांनी असोसिएशन अध्यक्षपदी तिसऱ्यादा निवड झाली असून सदर निवडीनंतर सर्व फोटोग्राफरनी अमित मुल्ला याचे अभिनंदन केले.उपाध्यक्षपदी श्री.सुनील करपे,सचिवपदी श्री.सचिन सोनवणे आणि खजिनदार म्हणून श्री.सचिन सरतापे याची एकमताने निवड करणेत आली.यावेळी बोलताना अमित मुल्ला म्हणाले आज माझी असोसिएशन अध्यक्षपदी तिसऱ्यादा एकमताने निवड झाली असून आपण सर्व सदस्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखविला आहे त्याबद्दल मी आपले सर्वाचे आभार मानतो.भविष्यात असोसिएशन मजबूत करन्याचा प्रयत्न करणार आहे.

आजमितीला फोटोग्राफर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून कोरोना काळात फिटोग्राफेर लोकांचे खूप हाल झाले.फिटोग्राफेर याकाळात पूर्णपणे दुर्लक्षित झाला होता यामुळे आमच्या बांधवाना यापुढील येणाऱ्या काळात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापर्यत आपल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न करणार असून फोटोग्राफर्सना अडचणीच्या काळात अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर सुधीर खटावकर,राजू केवटे(आर.के.),माजी अध्यक्ष गाजू ढोले,जितू गलांडे,राहुल खटावकर,सुनील करपे,सचिन सरतापे, चंदू बनगर,राहुल कांबळे,सचीन सोनवणे,पिंटू पान सांडे, सज्जन लोहार आदी फोटोग्राफर्स उपस्थित होते.सचिन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वाचे आभार मानले.
महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED