भाऊसाहेब जामगे यांच्या शिवाय गंगाखेडची सांस्कृतीक चळवळ अपूर्ण – गोविंद यादव

27

🔹ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.14जानेवारी):-भाऊसाहेब जामगे यांनी गंगाखेडची सांस्कृतीक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. त्यांच्या नावाशिवाय गंगाखेडची सांस्कृतीक चळवळ पूर्ण होवू शकत नाही, असे प्रतिपादन तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केले.

कै. भाऊसाहेब जामगे यांच्या प्रथम पुण्यतीथी निमित्त आयोजीत राज्यस्तरीय ऑनलाईन नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात श्री यादव बोलत होते. राजमाता आई जिजाऊ यांची जयंती आणि युवा दिनाचे औचित्य साधत गंगाखेड येथील डीॲक्ट डान्स ॲकॅडमी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी निर्माते-दिग्दर्शक अजमत खान हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य दिग्दर्शक संदीप राठोड, सिनेकलावंत प्रियंका ऊबाळे, न. प. प्रकल्प अधिकारी अंजना बीडगर, जेष्ठ पत्रकार शंकर ईंगळे, सामाजीक कार्यकर्त्या सुर्यमाला मोतीपवळे, संजय लाला अनावडे, आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. भाऊसाहेब जामगे यांच्या पत्नी संगीता जामगे, आकाश जामगे यांनी या ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते.

त्यास ऊत्तम प्रतिसाद लाभला. संगीता जामगे यांनी पतीच्या अकाली मृत्यू नंतर ज्या हिमतीने सांस्कृतीक चळवळ पुढे चालू ठेवलीय, त्याचे कौतूक करत गोविंद यादव यांनी भाऊसाहेब जामगे यांच्या या क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. मोंढ्याचा राजा जय महाराष्ट्र गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अथवा दहीहंडी या कार्यक्रमांमधून जामगे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. नृत्य कलाकार असलेले भाऊसाहेब जामगे हे अभिमान नसलेले ऊत्तम कलाकार होते, अशा शब्दात गोविंद यादव यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. निर्माते- दिग्दर्शक अजमत खान यांनी आपल्या आगामी चित्रपटात स्थानिक कलाकारांना संधी देणार असल्याचे यावेळी बोलताना सांगीतले.

विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. याचवेळी संगीता जामगे यांच्या कवितेचे प्रकाशन करण्यात आले . श्रीमती जामगे यांनी कविता वाचन केले. डीॲक्ट चे भुषण गाडे, प्रियंका अवचार, ममता पैठणकर, सुनिता घाडगे, रूक्मीन घाडगे, गुणास सोनवणे भाभी, लक्ष्मी आडे, प्रभा राजेंद्र आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक संगीता जामगे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्ता बोरीकर यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य स्पर्धक, पालकांची ऊपस्थिती होती.