कौडगाव वासियांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील शहिदांना वाहिली आदरांजली

38

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.15जानेवारी):- तालुक्यातील मौजे कौडगाव येथे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली वाहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे.

यासाठी कित्येक वर्षे हा लढा आंदोलन चालू होते तरी हा प्रश्न निकाली काढून सदरील विद्यापिठास घटनाकाराचे नाव देण्यात यावे असा निर्णय झाला असताना सुद्धा कित्येक वर्षे हा प्रश्न निकाली न काढता मराठवाडा विद्यापीठ नामांतर चा प्रश्न भिजत ठेवून जातीय सलोखा बिघडवून मराठा विरूद्ध दलीत असा वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करुन नामांतर प्रश्नांची आग धगधगती ठेवण्याचे काम त्यावेळेसच्या सत्ताधार्यांनी केले त्यांच्या नावावर हजारो समाजबांधवार अतोनात अत्याचार करुण सत्तेचा मलिदा खाण्याचे काम त्यांनी केले. ह्याच लढाईत विद्यापिठाला घटनाकारांचे नाव देण्यात यावे याकरिता परभणी जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील शुर योद्धा पोचीराम कांबळे व चंदर कांबळे,गौतम वाघमारे यांच्या सारख्या हजारो माता भगिनी बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

अखेरीस 14जानेवारी 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर न करता नामविस्तार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे नाव देण्यात आले. त्या दिवसापासून 14 जानेवारी हा दिवस मराठवाडा नामविस्तार दिन म्हणून साजरा करुन शाहिद क्रांतिविरांना अभिवादन करण्यात येते.याच दिवसाचे औचित्य साधून केज तालुक्यातील मौजे कौडगाव येथे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदरील कार्यक्रमात नामांतर चळवळीतील लढ्याबाबत संविस्तर अशी माहिती उपस्थितांना पत्रकार नवनाथ पौळ यांनी सांगुन नामांतर चळवळीचे महत्व उपस्थितांना सांगून शहिदांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली.यावेळी कौडगाव ग्रामपंचायत सदस्य मधुकर गायकवाड, पत्रकार नवनाथ पौळ, राहुल गायकवाड, भैय्यासाहेब गायसमुद्रे,हर्षद पौळ, बालासाहेब पौळ,गणपत गायकवाड, अभिमान गायकवाड, विठ्ठल कांबळे, राजेश गायकवाड,सतिश पौळ, बाळासाहेब पौळ यांच्या सह रमाई गायकवाड,चंद्रकला गायकवाड आदी माता भगिनी उपस्थित होत्या.