नेर येथे बिबट्या चा धुमाकूळ गाईचे वासरू वर हल्ला करुन केले ठार

30

✒️ संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.15जानेवारी):- नेर येथील काही दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. नेर येथे भदाणे शिवारात बिबट्याने वासरू वर हल्ला करत ठार केले ही घटना १५ रोजी सकाळी ७:०० सुमारास घडली. मोहन तानाजी खलाणे यांच्या स्वतः मालकीचा शेतात शेड मध्ये बांधलेले गाईचे वासरू चा अचानक बिबट्या ने धाव घेत गाईच्या वासरू चा फडशा पाडला.

व तेथून बिबट्या पसार झाला. नेर परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. नेर येथे बिबट्या मुळे गाव व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या शेती कामांना वेग आलेला आहे बिबट्याची धास्ती निर्माण झाली रात्रीच्या वेळी धोक्यात जीव घालून पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी वर्ग जात असून शेतात कसे जायचे हा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. वन विभागाने लक्ष घालावे व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.