भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत

43

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15जानेवारी):- जिल्हातील कनिष्ठ, वरीष्ठ व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेशित अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्याना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते.

या योजनेकरीता नविन अर्ज सादर करण्याची व नुतणीकरणाची अंतिम मुदत दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ ही असुन विद्यार्थ्यानी मुदतीपुर्व अर्ज सादर करावे, असे अवाहान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.