भव्य रक्त तपासणी शिबिर व संपूर्ण आरोग्य शिबिराचे अत्यल्प दरात चिंतामणी क्लिनिकल लॅब

    35

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.16जानेवारी):-गंगाखेड शहरातील सौ गीतांजली मंगरुळकर यांच्या चिंतामणी क्लिनिकल लॅब च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत भव्य रक्त तपासणी शिबिर व संपूर्ण आरोग्य शिबिराचे अत्यल्प दरात आयोजित करण्यात आले आहे एकदाच तपासनीस दिलेल्या रक्तातून ५८ तपासण्या गंगाखेड शहरात प्रथमच केल्या जाणार आहेत. या शिबिराचे शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ रोजी उदघाटन अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

    या वेळेस प्रमुख अतिथी म्हणून माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नंदकुमार सोमाणी, इले्ट्रॉनिक्स असोशियेशन चे अध्यक्ष विलास मंगरुळकर, कोष अध्यक्ष शिवाजी जाधव, लक्ष्मणराव लटपटे,सचिन पवार, दीपेंद्र मंगरुळकर या कार्यक्रमाचे आयोजक सौ गीतांजली विलास मंगरुळकर डॉ. वरद मंगरुळकर कु. श्रुती मंगरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या अती अवशक शिबिराचा गरजू रुग्णांनी व नागरिकांनी स्वर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय सुपेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.