क्रांतीच्या दिशेनं उडत पाऊलं

98

मनामनात क्रांतीचं बीजं
कणाकणात संचारते तीजं
शरीरातून वाहते रक्त
नव्या संघर्षानं युक्त….

पेटलेल्या अग्नीज्वाला मनात
असहिष्णूतेला बंद करू कुपीत
विषम शेंडीधाराला लावू आग
समतेची उगवू बाग….

तुमच्या अगुलीनिर्देशकाचा इशारा
आमच्या लढाईचा पिसारा
तुमच्या शब्दगर्भाचे असे
आमच्या उन्नतीचे तंत्र…

विद्रोहाचे करू बंड
लोकशाहीचे लावू झाड
अन्यायावर आसूड ओढू
भेदाभेदाच्या भिंती पाडू…

मूलतत्ववाद्यांच्या मनात वाईट कारू
त्याच्या मनात अखंड बुध्द् पेरू
नव्या विचाराची कास धरू
उधानलेल्या मनाला शांती देऊ…

काळ्या दगडात गोड पाणी
भारतीय संविधान जनकल्याणी
पांखडी ग्रंथाची करू नाकेबंदी
भारताची मजबूत करू तटबदी…

मानवतेचे विशाल जग
एकात्मतेचे मोठे रग
उठ मानवा जागा हो
सम्यकतेचा पाईक हो…

धगधगत्या शब्दजाणिवांचे
क्रांतीच्या दिशेनं उडत पाऊलं
अन्याय पेरणाऱ्या अवडंबराचे
उध्दवस्त करू राजमहाल…

✒️संदीप गायकवाड(मो:-९६३७३५७४००)