जोशी, तुम्ही हजारो वर्षे बहूजनांच्या बुडावर लाथा घालत आला त्याचे काय ?

31

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात लिहीलेल्या लेखाने अनेकांच्या बुडात जाळ झाला. खरेतर सदरचा लेख लिहीतानाच मला याची जाणिव होती. काही मंडळी शिंमगा करणार हे माहित होते. जसे अपेक्षित होते तसेच घडले. काल दिवसभर अशा अडाणचोट लोकांचे फोन चालू होते. यातला एकही फकड्या लेखातल्या मुद्यावर बोलत नव्हता. काश्मिर, पाकीस्तान, खलिस्तान, ३७० वे कलम वगैरे गोष्टींच्याच बाता मारत होते. खरेतर ही सगळी गँग संघाच्या वाटसप विद्यापिठातल्या चुगली आणि लावालावी शाखेतली. जे वाटसप विद्यापिठातून प्रसवले जाते तेच यांच्यासाठी ब्रम्हवाक्य असते. वाटसप विद्यापिठातून आलेल्या विषारी फुसकूळ्या ही मंडळी विचार न करता पुढे ढकलत राहतात. असे अनेक अर्धवटराव काल बोंबा मारत होते. काही फोन करून तर काही स्वत:च्या वाटसप ग्रुपवर. माझ्या काही मित्रांनी त्याचे स्क्रीन शॉट मला पाठवले. एखाद्या कुत्र्याला चौकात दगड मारला की ते तिथे न भुंकता तिथून पळ काढते आणि आपल्या मालकाच्या अंगणात जावून जोरजोरात भुंकायला सुरूवात करते.

तिथे भुंकताना ते वाघाचाच आव आणते. अशीच काही मंडळी स्वत:च्या वाटसप ग्रुपवर दत्त्या वगैरे वगैरे म्हणत विष ओकत होती. या लोकांची त्यांच्या वाटसप ग्रुपवरची भुंकाभुंकी आणि मालकाच्या अंगणात जावून जोरजोरात भुंकणा-या कुत्र्याचे भुंकणे यात मला फारसा फरक वाटत नाही. त्यामुळे या सर्व अर्धवटरावांना मी कधीच गांभिर्याने घेतलेले नाही. काल दिवसभर आलेल्या फोनपैकी एका फोनची मात्र आवर्जून दखल घ्यावी वाटली. त्यावर लिहायची इच्छा झाली म्हणूनच हा लेखनप्रपंच.

पुण्यातून एका जोशी नामक विद्वानाचा काल रात्री फोन आला होता. प्रारंभी हे महाशय लेख छानय पण काही प्रश्न होते असे बोलले आणि सुरू झाले. त्यांच्या प्रारंभीच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला होता. महाशय लेखातल्या मुद्द्यावर न बोलता, कँनडा, काश्मिर फिरून आले. मध्येच इंदिरा गांधीची सरदारांनी कशी हत्या केली, पंजाबी लोक कसे विश्वासास पात्र नाहीत हे सांगत त्यांच्या जन्मजात आगलावू प्रवृत्तीचा नमुणा दाखवून देत होते. अखेर स्वारी यशवंतराव चव्हाणांच्याजवळ पोहोचली. मनात साठ वर्षे साचलेल्या विषाची त्यांनी उलटी केली. यशवतराव मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रात कुळकायदा आणला. तुम्ही लोकांनी आमच्या ब्राम्हणांच्या जमिनी बळकावल्या म्हणाले. या सगळ्या वादात लेखातल्या एकाही मुद्यावर ते बोलले नाहीत. त्यांच्या या वाक्याने मला त्यांची मळमळ लक्षात आली. खरेतर पुणेकर जोशींनी जे विष ओकले तेच अनेकांच्या मस्तकात साचलेले आहे. गेली साठ वर्षे त्याच सुड भावणेने ही मंडळी महाराष्ट्रात धिंगाणा घालतायत. समाजा-समाजात विषपेरणी करतायत. लोकशाही मातीत जाईल, पुन्हा पेशवाई येईल आणि आपणच इथले पंतप्रतिनिधी होवू असा आशावाद या लोकांना वाटतो आहे.

गत पाच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि या तमाम पिलावळींना आभाळ ठेंगणे वाटू लागले. महाराष्ट्रात पुन्हा पेशवाईच आली या भ्रमात हे वावरू लागले, बोलू लागले होते. जे लोक घरातल्या घरात एखाद्याच्या विरोधात बोलतानाही माजघरात जावून बायकोच्या कानात बोलायचे तेच लोक जाहिरपणे सोशल मिडीयात व्यक्त होवू लागले. देशात प्रधानमंत्री आमचा, राष्ट्रपती आमचा, लोकसभेचा सभापती आमचा मग आमचं कोण काय वाकडं करणार ? या मस्तीत ही मंडळी आहे. १९४८ ला ब्राम्हणांची घरं जाळल्याचे, कुळकायद्याने जमिनी गेल्याचे ते सतत बोलत असतात. या बाबत त्यांच्यात सुडाची भावना असल्याचे त्यांच्या वागण्या-बालोण्यातून दिसते. पुणेकर जोशी तेच म्हणत होते. “तुम्ही आमची घरं जाळली आणि आमच्या ढूंगणावर लाथ घातली, आमच्या जमिनी बळकावल्या !” असे म्हणत होते. जोशींच्या बोलण्यात सुडाची भावना जास्त दिसत होती. खरेतर महाराष्ट्रात असा एक कंपूच तयार झालाय. याच कंपूने गांधीहत्या घडवून आणली. त्याच प्रवृत्तीचे हरामखोर वारसदार आजही भरपूर आहेत. गटारीच्या पाण्यात डासांची भरपूर पैदास होते त्याप्रमाणे या सुडबुध्दीची पैदास महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे.

सरसकट ब्राम्हण असे नाहीत पण संघाच्या गोल टोपीखाली मराठी मुलखात जी टोळधाड तयार झालीय ती अशीच आहे. बाकी ब्राम्हण मनमोकळेपणाने समाजाच्या सर्व प्रवाहात सामिल होतात. सर्वांना आपले मानतात, मिळून मिसळून चांगले काम करतात. त्यांच्या मनात जातीयवाद नसतो. पण काही आगलावू प्रवृत्तीची अत्यंत विषारी व जातीयवादी मानसिकतेची मंडळी जोरात कार्यरत आहे. बहूजनांना भडकावून, त्यांच्या मस्तकात विष पेरून आग लावायचे उद्योग करते आहे. या अशाच पिलावळींनी मोदी नावाची झुल पांघरूण आपले सडके उद्योग चालवले आहेत. यांच्या हाताशी काही बहूजन टाळकीही लागली आहेत. या टाळक्यांना अशा काकांचे गवतार (गोमुत्र) अंगावर पडल्यावर आपल्या सातशे पिढ्या स्वर्गाची ट्रीप करून आल्याचा आनंद होतो. ही विखारी मंडळी जे सांगते तेच त्यांना योग्य आणि सत्य वाटते.

पुणेकर जोशी म्हणाले, आमच्या बुडावर लाथा घालून आम्हाला हाकलून दिले ! पण तुम्ही हजारो वर्षे इथल्या बहूजनांच्या बुडावर लाथा घातल्या त्याचे काय ? तुम्ही त्यांचे शिक्षणाचे, लढण्याचे, माणूस म्हणून जगण्याचे अधिकार काढून घेतले. वर्ण श्रेष्ठत्वाच्या माजात बहूजन समाजाचे पराकोटीचे शोषण केले. त्यांना सामाजिक, मानसिक, आर्थिक गुलाम केले. सगळी समाज व्यवस्थाच तशी निर्माण केली. पोथ्या-पुराण लिहून तुमच्या मनातला हलकटपणा त्यात उतरवला. त्याचे प्रामाण्य देत बहूजन समाज भयंकर छळला. यासाठी तुम्ही पुरूष असलेला ब्रम्हदेव प्रसवला, यासाठीच तुम्ही बाप असलेल्या ब्रम्हदेवाकडून सरस्वतीला प्रसवले. अनिष्ठ प्रथा-परंपरा निर्माण करत लाखो महिला जाळून मारल्या. कुणी चुकून वेद वाचले किंवा ऐकले तर त्यांच्या कानात उकळलेले शिसे ओतले. अनेकांची मुंडकी उडवली. “धर्म बुडाला !” या नावाखाली कित्येकांचे हालहाल केले. हा सगळा बहूजन समाज केवळ तुमच्याच उपभोगासाठी हजारो वर्षे वापरलात. आज गाईला गोमाता म्हणणा-या त्यावरून इतरांची हत्या करणा-या याच नतदृष्टांनी गाई कापून खाल्ल्या. इतकेच नाही तर तुम्ही बसवेश्वर मारले, कबीर मारले, तुकाराम मारले, चोखामेळा मारले, गांधी मारले.

जोतिबा व सावित्रीबाईंना मरणयातना दिल्या. तुमच्या हरामखोरीचा व नालायकीचा हा इतिहास आजही जीवंत आहे. बहूजन समाजाने हे सगळं विसरलय. या बाबत मनात काहीही ठेवले नाही. कधीच बदल्याची भावणा ठेवली नाही. पण तुमच्या मनात सुडबुध्दी आहे. तुमच्या जमिनी बळकावल्या म्हणता पण बेट्यांनो शेतात पाय ठेवायचे, शेती कसायचे तुम्हाला माहिती आहे काय ? तुमच्या ज्या शंभर-दोनशे एकर जमिनी होत्या त्या पेशवाईत तुम्हीच बहूजनांच्या बळकावलेल्या होत्या. शेतीचं काम कुणबी करत होता ब्राम्हण नव्हे. त्यांच्याकडून त्या तुम्ही फसवून लिहून घेतल्या होत्या. नांगर सोडा कुळव धरायची अक्कल नसलेले दिडशे-दोनशे एकर जमिनीचे मालक कसे झाले ? अडाणी व भोळ्या बहूजन समाजाकडून त्यांच्या जमिनी लिहून घेतल्या तुम्ही. त्यांच्या त्याच जमिनी कुळ कायद्याने परत गेल्या. आता त्या जमिनी परत घ्यायच्या सदाशिव पेठी स्वप्नात तुम्ही वावरता आणि बोलता याची लाज वाटू द्या. पाश्चिमात्य देशात तिथल्या पाद्र्यांनी तुमच्यासारखीच हरामी केली होती. नवा विचार करणा-या आणि मांडणा-या लोकांना जाळून मारले होते पण त्यांनी कालांतराने त्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. त्यांना त्यांची चुक लक्षात आली.

त्यांनी खुल्या दिलाने नवा विचार मान्य केला. पण बेट्यांनो, तुम्ही अजून पेशवाईच्या भ्रमातून बाहेर यायला तयार नाही आहात. हा जातीयवादी हलकटपणा सोडून द्यायला तयार नाही आहात. मनातले विष टाकून द्या. असे म्हणतात की बिब्बा अंगच्या तेलाने जळतो. तुमच्या बुडावर ४८ साली लाथा घातल्या कारण तुम्ही गांधी मारले होते. आजही तुमची तीच मानसिकता व भावना आहे. आता लोक शहाणे झाले आहेत. तुमचे पेशवाईचे चाळे चालणार नाहीत. वेळीच शहाणे झाला नाहीत तर अनर्थ होईल कारण, “जे पेरलं तेच उगवतं !” हा निसर्गाचा नियम आहे. जी आग समाजा-समाजात लावून भांडण लावताय तीच आग तुम्हाला जाळून खाक करेल याचे भान ठेवा. मराठ्यांचा उरावर दलित सोडायचे, दलितांच्या उरावर मराठे सोडायचे, या दोघांंच्या इरावर ओबीसी सोडायचे. परत या सगळ्यांना मुसलमानांची भिती दाखवायची आणि मुसलमनांना हिंदूंची भिती दाखवायची. या सर्वांच्यात भांडणं लावून त्यांच्यावर राज्य करायचे ही तुमची निती आहे. हा ब्राम्हणद्वेष नाही, हा जाती द्वेष नाही. याला व्यक्तीगत घेवून जातीयवादी लेबल कुणी लावू नये. बाळांनो तुमचा हितचिंतक म्हणून पुढच्या धोक्याची जाणिव करून देतोय इतकेच.