सस्तेवाडीतील विकास कामासाठी २४ तास उपलब्ध – सुनिल वाबळे

    37

    ✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

    सातारा(दि.19जानेवारी):- सातारा जिल्हातील फलटण तालुक्यामध्ये सस्तेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी मिळवण्यात यशस्वी झालेले वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार सुनिल वाबळे यांनी सर्व मतदार बांधवांचे,भगिनींचे आभार मानले. तसेच सस्तेवाडीतील जनतेने पॅनल वर टाकलेल्या विश्वासाला तडाजाऊ देणार नाही, या निवडणुकीमध्ये प्रचार करन्यासाठी ज्या तरुणबांधवानी खूप कष्ट घेतले, तेच या पॅनलच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.

    सर्व जेष्ठ मंडळींचे सहकार्य प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभले त्या सर्वांचे मनापासून पॅनलच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो तसेच गावाच्या विकासासाठी तरूणांना सोबत घेऊन विकासकामे जेवढे करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे विजयी उमेदवार सुनिल वाबळे यांनी सांगितले. कोणत्याही अडचणीत मला कधिही केव्हाही हाक द्या मि सस्तेवाडीतील विकासासाठी २४ तास उपलब्ध असेल.समस्त ग्रामस्थांची साथ अशीच शेवट पर्यंत रहावी हीच अपेक्षा आहे. आता एकच ध्यास गावाचा विकास.